मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी (हनुमान नगर) येथे २६ मार्च पासून सुरू असलेला अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाची मंगळवारी (दि.२) रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.यावेळी जालिंदर महाराज शिंदे यांच्या काल्याच्या किर्तन झाले. तसेच गावातून बालगोपाल समवेत ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या तालात ज्ञानेश्वरी पारायन ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या सप्ताह कालावधीत दररोज रात्री सात कीर्तनकारांनी भाविकांना समाज प्रबोधन केले. पहाटे काकडा आरती, भजन, प्रवचन, हरिजागर आदी कार्यक्र म पार पडले. काल्याचे कीर्तन संपल्यानंतर महाप्रसादाच्या वाटपाचे सप्ताहाची सांगता करण्यात आली.यावेळी रंगनाथ महाराज महालखेडेकर, साहेबराव शेळके, तान्हाजी वावधाने, रमेश तळेकर, अलका मखरे, ऋ षि वावधाने, साई शेळके, ईश्वरी शेळके, साहिल शेळके, श्रध्दा तिपायले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हनुमान नगर ला सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 6:12 PM
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी (हनुमान नगर) येथे २६ मार्च पासून सुरू असलेला अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाची मंगळवारी (दि.२) रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
ठळक मुद्दे दररोज रात्री सात कीर्तनकारांनी भाविकांना समाज प्रबोधन केले.