शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हॅपी बर्थ डे, पंचवटी एक्स्प्रेस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:21 PM

बुधवारी सकाळी नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर वेगळीच लगबग दिसून येत होती. धावपळ तर नेहमीचीच होती, परंतु तरीही वेगळेपण होते, एखाद्या उत्सवाला साजसे वातावरण होते. अखेर सकाळी सात वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेली रेल्वे फलाटावर आली आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करताना प्रवाशांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हॅपी बर्थ डे टू पंचवटी एक्स्प्रेस...

नाशिकरोड : बुधवारी सकाळी नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावर वेगळीच लगबग दिसून येत होती. धावपळ तर नेहमीचीच होती, परंतु तरीही वेगळेपण होते, एखाद्या उत्सवाला साजसे वातावरण होते. अखेर सकाळी सात वाजेच्या सुमारास फुलांनी सजवलेली रेल्वे फलाटावर आली आणि ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करताना प्रवाशांच्या मुखातून शब्द बाहेर पडले हॅपी बर्थ डे टू पंचवटी एक्स्प्रेस... कुटुंबातील सदस्यांचा किंवा कोणा मित्रमंडळीचा वाढदिवस साजरा करावा असाच हा क्षण होता. गेल्या ४२ वर्षांपासून चाकरमाने, व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांची ने-आण करणारी पंचवटी एक्स्प्रेस नाशिककरांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनली आहे. त्यामुळेच कुटुंबातील सदस्याचा भासावा, अशा पध्दतीचा दिमाखदार वाढदिवस सोहळा पार पाडला.  सकाळी साजरा झालेल्या या सोहळ्यासाठी खास पंचवटी एक्स्प्रेसची प्रतिकृती असलेला केक तयार करण्यात आला होता. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, सल्लागार समिती सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, रेल परिषदेचे अध्यक्ष बिपीन गांधी, स्टेशन अधीक्षक एम. बी. सक्सेना यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच खासदार गोडसे यांच्या हस्ते पंचवटी रेल्वेचालक आणि गार्ड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. इंजिनला फुलांचे हार लावून सजविण्यात आले होते.  या सोहळ्यासाठी रेल परिषदेचे बिपीन गांधी, देवीदास पंडित, रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक जुबेर पठाण, किरण बोरसे, दिलीप सातपुते, संजय केदारे, कैलास बर्वे, इजाज शेख, धनंजय कुशारे, राजेंद्र पाटील, तानाजी गायधनी, चेतन बुरकुल, गोपाळ नाईक, नितीन जगताप, दत्ता गोसावी, प्रसाद पवार, पवन शिंदे, संजय शिंदे, सागर सोनवणे, बाळा गायकवाड आदींसह प्रवासी उपस्थित होते. १९७५ ला हिरवा झेंडा १ नोव्हेंबर १९७५ मध्ये सुरू झालेल्या या रेल्वेला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर पंचवटी एक्स्प्रेस अविरत धावत आहे. सुरुवातीला १९ डब्यांची असलेल्या या रेल्वेला कालांतराने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन २१ डबे करण्यात आले.नाशिकचे अतुट नाते पंचवटी आणि नाशिककरांचे गेल्या ४२ वर्षांपासून अतूट आणि भाविनक असे नाते आहे. नाशिकहून मुंबईला जाणारे आणि मुंबईहून नाशिकमध्ये येणारे चाकारमानांबरोबरच आप्तेष्टही पंचवटी एक्स्प्रेसमधूनच प्रवास करतात. त्यामुळेच सुखदु:खाच्या कोणत्याही कामांचे नियोजन पंचवटीच्या वेळेनुसार आखले जाते हे विशेष. पंचवटीच्या पासधारक बोगीमधून प्रवास करणाºया प्रवाशांचे कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे.