नाशिक : जिल्ह्यातील गावोगावच्या बाजारपेठेत दिवाळी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. दीपोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ पूर्णपणे सजली असून, ग्राहकांची गर्दी हळूहळू वाढू लागली आहे. दिवाळीच्या खरेदीनिमित्त शुक्र वारी आणि शनिवारी संध्याकाळी अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे खरेदीसाठी लोक बाहेर पडले नाही. रविवार सुटीचा वार यातच पावसानेही सायंकाळी सुटी घेतल्यामुळे गर्दीत अधिकच भर पडली. पणत्या, शिराया, बोळके, लाह्या-बत्तासे आदी खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळाली. आकाशकंदील, फराळाचे पदार्थ, सजावटीच्या साहित्यांबरोबरच कपडे आणि भेटवस्तूंच्या खरेदीसाठीही ग्राहकांनी दुकानात काहीशी गर्दी केल्याचे रविवारी दिसत असले तरी, यंदा म्हणावा तसा उठाव नसल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. गृहिणींना फराळ तयार करण्यापेक्षा यंदा रेडिमेड फराळावर ताव मारणाºयांच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. फराळाच्या पदार्थांच्या किमती गेल्या वर्षीपेक्षा १० ते २० टक्क्यांनी वाढल्याचे दिसत आहे, तरीही यंदा रेडिमेड फराळाला मागणी दिसत आहे.
दिवाळी खरेदीची लगबग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 12:03 AM