नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.नाशिक सेवा समितीतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.३) राजेश्वरी दीदी यांनी ‘सतयुग का सफर’ विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. राज दीदी म्हणाल्या, आत्मचिंतन व सकारात्मक बोलण्यातून घराघरांत सुख-समृद्धी व शांतता नांदू शकेल. तसेच सत्य व सुमधुर शब्द बोलण्यातून जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन व्यक्तीला यश प्राप्तीसाठी बळ मिळेल. प्रत्येक व्यक्तीने तन, मन, धन या दृष्टीने स्वस्थ राहिल्यास सर्वांना प्रगती, उन्नती सफलता प्राप्तकरणे शक्य असून, तन व मन स्वस्थ असणाऱ्या व्यक्तींना धनप्राप्तीही सहज होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी नाशिक सेवा समितीचे संरक्षक ब्रिजलाल धूत, नेमिचंद पोद्दार, प्रदीप बूब, संजय कारीवाला, ताराचंद गुप्ता, महावीर मित्तल, महेश पाटील, संजय सोनी यांच्या उपस्थितीत राजदीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष राजेश पारीख यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली, तर महामंत्री विमल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.अंतरात्माच खरा मार्गदर्शकव्यक्तीच्या मनातला, आतला आवाजच त्याचा खरा मार्गदर्शक असतो. जीवन एक प्रतिध्वनीसारखे आहे. जे आपण दुसºयांना देऊ तेच आपल्यालाही लाभेल. आपण दुसºयांना आनंद दिला तर आपल्यालाही आनंदाची प्राप्ती होईल व त्रास दिला तर आपलेही जीवन कष्टप्रत होईल. तेव्हा प्रार्थना व आशीर्वाद या दोन गोष्टी सर्वांसाठी देता व करता येण्यासारख्या असल्याने त्या द्यायला हव्यात, असेही राज दीदींनी सांगितले.सेव्हनस्टार आयुष्यासाठी...सहज, सरल, सुंदर, स्वस्थ, सफल, संपन्न व सार्थक या सेव्हनस्टार आयुष्यासाठी तन, मन धन व संबंध या चारही बाबतीत संतुलन असणे गरजेचे असल्याचे राज दीदी यांनी यावेळी सांगितले.
प्रसन्न, स्वस्थ मन:स्थितीतून होतात समृद्धीचे मार्ग खुले : राज दीदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 12:29 AM
नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.
ठळक मुद्देनाशिक सेवा समितीतर्फे सत्संग संपन्न