देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरात गेल्या दहा दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या समस्यांना नागरिक कंटाळले असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.देवगांव परिसरातील वावीहर्ष येथील जीर्ण झालेले पोल पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिसरातील विद्युत वाहिनीजुनी असून त्यावर नूतनीकरण न झाल्याने जीर्ण झालेल्या पोलांमुळे विद्युत पुरवठा खंडित होत आहे.दोनच दिवसांपूर्वी वैतरणा सब स्टेशनमध्ये ब्रेकर लाईनमध्ये बिघाड होऊन दोन ते तीन दिवस वीजपुरवठा खंडित होता. त्यामध्ये तब्बल दहा ते बारा गावांनी अंधाराचा सामना केला. या समस्येची सोडवणूक होते ना होते, तोच पुन्हा जीर्ण झालेल्या पोलांमुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. अशाखंडित होणाऱ्या विज पुरवठ्याला नागरिक कंटाळले आहे.महावितरण विभागाकडून वीज बिलाची आकारणी केली जाते. परंतु वीज पुरवठा केला जात नाही. किंवा बिलमध्ये सूट देखील दिली जात नाही. वारंवार होत असलेल्या खंडित विजपुरवठ्यावर तोडगा निघावा म्हणून देवगांव परिसरातील विजेच्या लाईनीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिक करत आहेत.खंडित वीज पुरावठ्यामुळे पाण्याची टंचाईवारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामूळे महिला वर्गांना पाणी टंचाईची झळ बसत आहे. एव्हाना नळाद्वारे येणारे पाणी वीज नसल्यामुळे एक ते दीड किलोमीटरची पायपीट करून आणावे लागते. त्यामुळे महिला वर्गांत संताप व्यक्त होत आहे.
वारंवार खंडित वीजपुरवठ्याने हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 9:35 PM
देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगांव परिसरात गेल्या दहा दिवसांपासून विजेची समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या समस्यांना नागरिक कंटाळले असून त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.
ठळक मुद्देदेवगाव : विजेचा खेळखंडोबा : जीर्ण झालेले पडले पोल