लासलगाव : सावरकरांनी अंदमान येथे मातृभूमी साठी भोगलेले कष्ट आणि सतत मनात असलेली देशभक्तीची ज्योतच सावरकरांचे या भारतभूमीवरील प्रेम अधोरेखित करते असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारु दत्त आफळे यांनी केले. जयोस्तुते या सामाजिक संस्थेच्या द्वितीय वर्धापनिदनाच्या निमित्ताने लासलगाव येथे रंगलेल्या कीर्तन सोहळ्यात अंदमान आणि सावरकर या विषयावर ते बोलत होते.या निमित्ताने संपूर्ण भारतवासीयांचे स्फूर्तिस्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील आफळे मोलत होते.कार्यक्र माच्या सुरु वातीला आफळे बुवांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत झाले. यावेळी जयोस्तुतेचा दोन वर्षांचा प्रवास ऋ षिकेश आहेर याने चित्रिफतीतून उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर व्यंकटेश वाबळे याने प्रास्ताविक केले. त्यानंतर श्रेया कुलकर्णी हिने आपल्या अध्यक्षीय भाषणातून जयोस्तुते ची ओळख करून दिली.यानंतर श्री आफळे बुवा यांनी आपल्या ओघवत्या शैलीने किर्तनाद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन इंद्रनील खंदारे याने तर आदित्य होळकर यांनी आभार मानले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी संस्थेचे मधुरा ठुबे, सौरभ कांदळकर, अपूर्व कुलकर्णी, प्रसाद भावसार, ऋ षिकेश आहेर आदींनी परिश्रम घेतले.
सावरकरांनी अंदमान येथे भोगलेले कष्ट भारतभूमी वरील प्रेम अधोरेखित करते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 6:36 PM
लासलगाव : सावरकरांनी अंदमान येथे मातृभूमी साठी भोगलेले कष्ट आणि सतत मनात असलेली देशभक्तीची ज्योतच सावरकरांचे या भारतभूमीवरील प्रेम अधोरेखित करते असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारु दत्त आफळे यांनी केले. जयोस्तुते या सामाजिक संस्थेच्या द्वितीय वर्धापनिदनाच्या निमित्ताने लासलगाव येथे रंगलेल्या कीर्तन सोहळ्यात अंदमान आणि सावरकर या विषयावर ते बोलत होते.
ठळक मुद्देचारुदत्त आफळे : लासलगाव येथे रंगला कीर्तन सोहळा