शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

नारायणाच्या मंत्रघोषात रंगला ‘हरिहर भेट’ सोहळा

By admin | Published: November 12, 2016 11:22 PM

वैकुंठ चतुर्दशी : गोरज मुहूर्तावर झाला तुलसीचा शाही विवाह

 नाशिक : झेडूंच्या फुलांचे आकर्षक तोरण, शेवंतीच्या फुलांच्या वेण्या अन् गुलाब-मोगऱ्याचा दरवळणारा मंद सुगंध हरिहर भेट महोत्सवा दरम्यान सुंदरनारायण मंदिरात भाविकांना अनुभवायला मिळाला. रविवार पेठेतील सुंदरनारायण मंदिरात हरिहर भेटी महोत्सवानिमित्त फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून शनिवारी (दि. १२) तुलसी विवाह आणि हरिहर भेट सोहळ्यासाठी भाविकांनी विशेष गर्दी केली होती.कार्तिक शुक्ल दशमी ते प्रतिपदा या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या महोत्सवाची जय्यत तयारी मंदिरात करण्यात आली असून, सुंदरनारायण मंदिराच्या गर्भगृहात मध्यभागी सूर्यनारायणाची (विष्णू) मूर्ती, विष्णूच्या उजव्या हाताला देवी लक्ष्मी आणि डाव्या बाजूला वृंदा (तुळस) आणि त्यांच्या पुढ्यात असणारे गरूड वाहन आकर्षक फुलांच्या सजावटीने भक्तांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी वृंदा देवीचे कंठी, चिंचपेटी, चंद्रहार या अलंकारातील रूप तर लक्ष्मीहार आणि कंठीहारातील नारायणाचे रूप अधिकच खुलून दिसत होते. शनिवारी (दि. १२) वैकुंठ चतुर्दशीला गोरज मुहूर्तावर नारायणाचा वृंदा देवीसोबत गोरज मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा झाला. वैकुंठ चतुर्दशीला संध्याकाळी विवाह झाल्यानंतर मध्यरात्री हरिहर भेटीचेदेखील आयोजन संस्थानतर्फे करण्यात आले होते.शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता श्री सुंदरनारायण मंदिर येथे श्री सुंदर नारायण आणि कपालेश्वर यांची भेट झाली. वर्षभर नारायणाला तुळस आणि महादेवाला बेल वाहण्यात येत असला तरी वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री मात्र महादेवाला वाहिलेला बेल नारायणाला वाहण्यात आला तर नारायणाला वाहिलेली तुलसीपत्रे महादेवाला वाहण्यात आली. तुलसीपत्रात नारायणाचा अंश आणि बेलपत्रात महादेवाचा अंश असल्याचा शास्त्रात उल्लेख असल्याने हरिहर भेटीत तुलसीपत्र आणि बेलपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण भारत देशात हरिहर भेट फक्त नाशिकलाच होत असल्याने या महोत्सवासाठी देशभरातील विविध भागांतून भाविक दर्शनासाठी आले होते. कार्तिक शुद्ध दशमी गुरुवारपासून (दि. १०) सुरू झालेल्या हरिहर भेट महोत्सवाची कार्तिक शुद्ध प्रतिपदेला मंगळवारी (दि. १५) सूर्यास्तानंतर रामकुंड येथे होणाऱ्या अवभृत स्नानाने सांगता होणार आहे. (प्रतिनिधी)