मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील दरवर्षी अतिशय मंगलमय वातावरणात साजरा होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सप्ताह सोहळा या वर्षी कोरोनाच्या पाशर््वभूमी रद्द करण्यात आला आहे.गावातील काही मोजक्या वारकरी संप्रदायातील भाविकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. डोंगरगाव या सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाची कसमादे परिसरातील शेती प्रधान आणि वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून ओळख आहे. या गावातील हभप बाबुलाल महाराज आढाव यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोदगत आहे. हभप चंद्रकात महाराज सावंत यांची परिसरात प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून ख्याती आहे. याशिवाय अबालवृद्ध वारकरी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या गावात श्रीराम मंदिर, शिव मंदिर, गणेश मंदिर, अहिल्याबाई होळकर मंदिर यांचे मंदिर आहेत. गाव लहान पण मंदिराची रेलचेल आहे. या गावातीलच काही समाजसेवी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात विविध कार्यक्रम राबविले जातात़मोजक्याच भाविकांची उपस्थिती श्रावण महिन्याच्या आरंभास सुरू होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सोहळा हा मोठ्या मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात साजरा दरवर्षी होतो. या दरम्यान आठवड्यात अनेक नामवंत कीर्तनकारांची संकिर्तने होतात. लोकवर्गणीतुन हा सोहळा साजरा होतो मात्र या वर्षी देशभर कोरोनाने रद्द केला आहे. त्यामुळे या वर्षी पारायण सोहळा अगदी मोजक्याच सात ते आठ भाविकांनी ज्ञानेश्वरी पारायण सुरू केली आहे. परंपरा कायम ठेवून साध्या पद्धतीने कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे.