शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नाशिक शहरात हर्ष चोरडिया अव्वल

By admin | Published: June 24, 2017 1:04 AM

नाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणेजच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६०५ गुण मिळवून नाशिकमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणेजच नीट २०१७ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६०५ गुण मिळवून नाशिकमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने निकाल जाहीर केला असून, विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.शहरातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे १९ परीक्षा केंद्रांवर एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून जवळपास १० हजार ५०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ६०५ गुण मिळवित अव्वल स्थान पटकावले असून, नेहा झाजेरिया हिने ६०० गुण मिळवून यश संपादन केले आहे. सुचितसिंग वालिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ५७१ गुण मिळवून यश आॅल इंडिया १५ आरक्षणात ३ हजार ८६९ क्रमवारी मिळविली आहे, तर मुर्तझा रनाळवाला २१२ गुण, अक्षय शिरसाठ (५११), रश्मी जोशी (४९१), तेजल भावसार (४८३), आकांक्षा नाकील ४६४ व प्रतीक्षा मुटकूल (४६१) गुण मिळवून संपादन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १२ जून रोजी नीट परीक्षेचा निकाल २६ जून २०१६ पर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि.२३) निकाल घोषित करण्यात आला. देशभरात ७ मे रोजी नीट परीक्षा पार पडली होती. यंदा सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यापैकी १०.५ लाख विद्यार्थ्यांनी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये परीक्षा दिली, तर उर्वरित सव्वा लाख विद्यार्थ्यांनी इतर आठ भाषांची निवड केली होती. यावर्षी नीट परीक्षा दहा भाषांमध्ये घेण्यात आली होती. नीट परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एमबीबीएस आणि बीडीएससाठी प्रवेश घेता येणार आहे.