लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट म्हणेजच नीट २०१७ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ६०५ गुण मिळवून नाशिकमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईने निकाल जाहीर केला असून, विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.शहरातील विविध महाविद्यालयांमधील सुमारे १९ परीक्षा केंद्रांवर एमबीबीएस आणि बीडीएस प्रवेशासाठी नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी नाशिक विभागातून जवळपास १० हजार ५०० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यातील हर्ष चोरडिया या विद्यार्थ्याने ६०५ गुण मिळवित अव्वल स्थान पटकावले असून, नेहा झाजेरिया हिने ६०० गुण मिळवून यश संपादन केले आहे. सुचितसिंग वालिया या विद्यार्थ्याने ७२० पैकी ५७१ गुण मिळवून यश आॅल इंडिया १५ आरक्षणात ३ हजार ८६९ क्रमवारी मिळविली आहे, तर मुर्तझा रनाळवाला २१२ गुण, अक्षय शिरसाठ (५११), रश्मी जोशी (४९१), तेजल भावसार (४८३), आकांक्षा नाकील ४६४ व प्रतीक्षा मुटकूल (४६१) गुण मिळवून संपादन केले आहे.
नाशिक शहरात हर्ष चोरडिया अव्वल
By admin | Published: June 23, 2017 6:46 PM