त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पाचही ग्रामपंचायतींचे चित्र स्पष्ट झाले. हरसूल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासह सर्वच्या सर्व पाच प्रभागांतील १३ जागांसाठी एकूण ४५ उमेदवार रिंगणात आहेत.सरपंचाच्या थेट निवडणुकीत पाच वर्षे अमर्याद सत्ता मिळणार असल्यामुळे सरपंच निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी सरपंचपद उपभोगलेले उमेदवारदेखील रिंगणात उतरले आहेत.होलदारनगरमध्ये ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थाचे निधन झाले. विशेष म्हणजे तेच सरपंचपदाचे उमेदवार असल्याने यावेळेस कोणीच उमेदवारी अर्ज दाखल न केल्याचे बोलले जात आहे. महादेवनगर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंचपदासह बिनविरोध पार पडली. यामध्ये विष्णू धर्मा बेंडकुळी यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली, तर प्रभाग १ मोहन निवृत्ती कचरे व अनुसया विष्णू बेंडकुळी, प्रभाग २ यशवंत खंडू बेंडकुळी व प्रमिला तुकाराम बेंडकुळी, प्रभाग ३ मीना मोहन नळवाडे, बाळू कृष्णा बेंडकुळी व मुक्ताबाई हिरामण माळेकर असे तीन प्रभागांतील आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. टी. सूर्यवंशी यांनी, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. टी. महाले यांनी काम पाहिले.वायघोळपाडा ग्रामपंचायतीत प्रभाग १ प्रकाश राऊत व कुसुम सापटे, प्रभाग २ उषा महाले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर प्रभाग २ मधीलच पुरुष जागेसाठी मतदान होणार आहे. प्रभाग ३ मधून पुष्पा सुरेश झोले बिनविरोध झाल्या असून, पुरुष जागेसाठी मतदान होणार आहे.सापगाव ग्रामपंचायत निवडणुकीत हेमंत कुलकर्णी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काम पाहिले. त्यांना एन. व्ही. परदेशी यांनी साहाय्य केलेयक निवडणुक निर्णय अधिकारी काम पाहात आहेत.
हरसूलला सरपंचासह ४५ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 1:09 AM