नाशिक : सामाजिक सुरक्षा व जातीय सलोखा वृध्दिंगत व्हावा, जेणेकरुन कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, या उद्देशाने ग्रामिण पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हरसूल मॅरेथॉन-२०१८’मध्ये अंकिता बांगाड ही वाघेरा आश्रमशाळेची विद्यार्थिनी प्रथम आली. या मॅरेथॉनमध्ये सुमारे हरसूल परिसरातील एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांनी धाव घेतली.ग्रामिण पोलीस दलाचे अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) सकाळी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. यावेळी धावपटू कविता राऊत राऊत फाउण्डेशनचे मुख्यधिकारी महेश तुंगार यांच्या हस्ते झाले. सकाळी सात वाजेपासून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. शाळकरी मुलींसाठी तीन किमीचा गट होता. तर मुख्य स्पर्धेनंतर पोलिस अधिकारी,कर्मचारी, नागरीकांवह विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे आनंदी दौड लगावली. मॅरेथॉन स्पर्धेसाठी अप्पर पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अधिक्षक ओमक्का सुदर्शन, हरसूलचे प्रभारी पोलिस अधिकारी प्रविण साळुंखे, तहसिलदार महेंद्र पवार, पंचायत समिती उपसभापती रवींद्र भोये, रोहिणी दराडे, आदींसह उपस्थीत होते.
हरसूल मॅरेथॉन-२०१८ : एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 6:20 PM
या मॅरेथॉनमध्ये सुमारे हरसूल परिसरातील एक हजार आदिवासी शालेय विद्यार्थ्यांनी धाव घेतली. ग्रामिण पोलीस दलाचे अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते शनिवारी (दि.१०) सकाळी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला.
ठळक मुद्देमहिला सुरक्षा व सामाजिक सलोख्यासाठी आदिवासींमध्ये जनजागृती पोलीस अधिक्षक अधिक्षक संजय दराडे यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा वाघेरा आश्रमशाळेची अंकिता बांगाड ही विद्यार्थिनी प्रथम