शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 11:12 PM

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. प्रारंभी त्यांनी ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघात शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पिंपळगाव बसवंत, वडनेरभैरव, उमराणे, तिसगाव, मंगरुळ, सोग्रस, मालसाणे आदी गावांमधील शेतकºयांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान कोणतीही अट न घालता शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी ओझर येथील बैठकीत शेतकºयांनी केली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांना साकडे : ओझर येथे बैठक; गिरीश महाजन यांच्याकडून निफाड, चांदवड भागात नुकसानीची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. प्रारंभी त्यांनी ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघात शेतकऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पिंपळगाव बसवंत, वडनेरभैरव, उमराणे, तिसगाव, मंगरुळ, सोग्रस, मालसाणे आदी गावांमधील शेतकºयांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. दरम्यान कोणतीही अट न घालता शेतकºयांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी ओझर येथील बैठकीत शेतकºयांनी केली.ओझर : परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक तसेच सर्वच शेतपिके उद्ध्वस्त झाली असून, यातून शेतकरी उभा राहूच शकत नाही त्यामुळे शासनाने पंचनामे, नुकसानभरपाई या भानगडीत न पडता महाराष्ट्रातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी एकमुखी मागणी ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत द्राक्ष संघ पदाधिकारी व शेतकºयांनी केली.याबाबत सरकार नक्कीच शेतकरी हिताचा सकारात्मक निर्णय घेईल आणि शेतकºयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील अशी स्पष्ट ग्वाही पालक मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बनकर, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, माजी आमदार अनिल कदम, जिल्हा द्राक्ष संघाचे अध्यक्ष रवींद्र बोराडे, अशोक गायकवाड, अरुण मोरे, जगन्नाथ खापरे, कैलास भोसले, माणिकराव पाटील आदींसह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले असून, पिके जमीनदोस्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थितीत शेतकºयांची बैठक आयोजित केली होती. द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील ८० हजार हेक्टरवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त केल्या आहेत.यात सटाणा, कळवण भागातील अर्ली कटिंगच्या द्राक्षबागा पूर्णपणे तयार झालेल्या होत्या. ते संपूर्ण पीक शेतकºयांच्या हातून गेले आहे. आजच्या परिस्थितीत प्रत्येक द्राक्ष उत्पादकावर हेक्टरी १२ ते १५ लाख रुपयांचे कर्ज आहे, याशिवाय द्राक्ष शेती व द्राक्ष निर्यात व्यवसायात जिल्ह्यात पाच लाख कामगार काम करतात. या सर्वांवर बेकारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत शेतकरी कर्जफेड करू शकत नाही. महसूल विभागाने पंचनामे सुरू केले असले तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. विम्याचे धोरण निश्चित नाही त्यामुळे शेतकरी वाचवायचा असेल तर सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, अशोक गायकवाड, अरुण मोरे, कैलास भोसले आदींनी शेतकºयांच्या व्यथा मांडल्या.शेतकºयांना भीक मागण्याची वेळ येऊ देऊ नका त्यासाठी सरसकट कर्जमाफी द्या, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. यावेळी अनेक शेतकरी शासनाच्या धोरणाविरोधात संतप्त झाले होते.बॅँकेच्या वसुलीला स्थगितीचे आदेशबागायतदार संघात झालेल्या बैठकीत अनेक शेतकरी संतप्त झाले होते. शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सक्तीची वसुली, जमिनीचेलिलाव, जप्तीची कारवाई बँकेने सुरू केली असल्याचा तक्र ारींचा पाढा शेतकºयांनी गिरीश महाजन यांच्यासमोर मांडला. यावर गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना सक्तीची वसुली, जमिनीचे लिलाव, जप्ती, वीजबिल वसुली तातडीने स्थगित करण्याचे आदेश दिले. अशा लेखी सूचना सर्व बँका व संबंधितांना देण्याचे आदेश गिरीश महाजनयांनी दिले.आमचे पैसे कुठे गेले याचे उत्तर द्यापालकमंत्री गिरीश महाजन जेव्हा बोलायला उभे राहिले तेव्हा सभागृहात बसलेल्या काही द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी उभे राहत रौद्रावतार धारण केला. मागे झालेल्या गारपिटीचा मोबदला सर्व कागदपत्रे देऊनदेखील अद्याप मिळाला नसून तो पैसा कुठे गेला याचे उत्तर आम्हाला आत्ता द्या. असा सवाल एका शेतकºयाने केल्यानंतर महाजन यांनी माइक काही सेकंदासाठी खाली केला असता एका शेतकºयाने तुम्ही पालकमंत्री आहात आम्हाला तुमच्याकडून उत्तर हवे आहे असे सांगितले. त्यांनी लागलीच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे पाहिले. ते तातडीने महाजन यांच्याजवळ आले, त्यांना थोडक्यात काहीतरी सांगितले व पालकमंत्र्यांनी याची चौकशी करून याच आठवड्यात सदर पैसे तुमच्या खात्यावर वर्ग होतील, चिंता करू नका असे आश्वासन दिल्यावर वातावरण शांत झाले व त्यांनी मूळ भाषण सुरू केले.परतीच्या पावसाने शेतकºयांवर आलेले संकट शब्दांपलीकडले असून, पन्नास वर्षांत प्रथमच असा प्रसंग उद्भवला आहे. नाशिक जिल्ह्यासह विदर्भ, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आदी सर्वच भागातील फळबागा, सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी, केळी उद्ध्वस्त झाल्या आहे. या संकटात शासन शेतकºयांच्या पाठीशी असून, दहा हजार कोटी रु पयांची प्राथमिक तरतूद केली आहे. ती अंतिम मदत नाही तर पंचनाम्यानंतर चित्र स्पष्ट होईल त्यावेळी सर्व मदत दिली जाईल. तसेच दोन दिवसातच द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बोलावली जाईल व याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.- गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी