शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 6:02 PM

अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.

मानोरी : अडीच महिन्यांपासून येवला तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या यातना सहन करत असताना मानोरी बुद्रुक, खडकीमाळ आदी परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिकांचे कमी उत्पादन घेतले आहे. विहिरीतील आणि बोअरवेलमधील पाण्याची साठवण करून गहू, हरभरा, कांदा पिके जगविण्यासाठी धडपड असाताना दुसरीकडे हरणांचे कळप धुमाकूळ घालत पिकांची नासधुस करत आहे. गेल्या आठ दिवसांपासून वीस हरणांचा कळप मानोरी बुद्रुक परिसरातील शेतशिवारातील पिकांची नासाडी करत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.येवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर भागात मोठ्या प्रमाणात हरणांचे वास्तव्य आहे. यातीलच अनेक हरणांचे कळप पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करत आहे. हे वीस हरणांचे कळपदेखील अन्न आणि पाण्याच्या शोधात मानोरी बुद्रुक परिसरात आले असल्याची चर्चा आहे. शेतातील हरभरा, तूर, गवत, हिरवा घास खाण्यासाठी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आपली पिके वाचवण्यासाठी काही शेतकरी शेताची राखण करत आहे. अशावेळी शेतात व्यक्तीला बघितल्यानंतर हरणांचा कळप धूम ठोकत शेतातील उभ्या पिकातून पळत सुटल्याने उभी पिके भुईसपाट होऊन नुकसान होत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. दोन ते तीन दिवसांपासून शेतकरी या हरणांच्या कळपाला हुसकवण्याचा प्रयत्न करत असून, हरणांचे कळप दिवसाऐवजी रात्रीच्या वेळी शेतात धुडगूस घालत आहे. हिरवा घास हरिण खाऊन जात असल्याने घरच्या जनावरांच्या चाºयाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकरी चिंतित आहे. सहा ते सात कुत्र्यांची एक टोळी या हरणांच्या कळपाच्या मागावर असून, अनेकदा हरीण पकडण्याचा प्रयत्न कुत्र्यांनी केला आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन वानर पाण्याच्या शोधात मानोरीत आले होते. या वानरांनी तब्बल बारा दिवस मानोरीत मुक्काम ठोकून आपली तहान भागवत होती. वनविभागाने हरणांच्या पिण्याच्या पाण्याची अन्नाची सोय करणे गरजेचेअसल्याच ेशेतकर्यांनी सांगितलेआहे. 

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती