जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर व पश्चिमेकडील भागात सध्या दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे, शेतकरी चिंताग्रस्त बनला असून आता औषध फवारणी करून शेतकऱ्यांचा खर्च भरमसाट वाढत असून पिकांमध्ये सुधारणा होत नसल्याने औषधे फवारणी करु न वैतागून पिके सोडून देण्याची वेळ आली आहे.अनेक शेतकऱ्यांनी पावसावर पेरलेल्या गहु पिकाला थंडीच न मिळाल्याने कमी कालावधीत गहु पिक निसावले गेल्याने उत्पादनात घट येणार आहे तर काही शेतकºयांनी नांगर घातला आहे. धुके व दव मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. निसर्ग यावर्षी शेतकºयांना पाहिजे त्या प्रमाणात साथ देत नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.महागडी औषधे एक औषधांचा हात द्यायचा म्हटला तर भरमसाठ खर्च करावा लागत आहे . सध्या ढगाळ हवामानामुळे गहू, हरभरा, कांदा रब्बीचे पीक मोठ्याप्रमाणावर संकटात सापडली आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती आणि यावर्षी पाऊस होऊनही शेतकर्यांना उत्पन्न निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने कांदा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. कांद्याच्या लागवडीचा व मशागतीसाठी शेतीचा रासायनिक खते, औषधे, मजुरी आधीचा खर्चाचा मेळ कसा बसायचा, यामुळे शेतकरी बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.हवामान तज्ञांनी पावसाचा इशारा दिल्याने पाऊस येतो की काय या धास्तीने शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनेक दिवसापासून धुके, दव आणि रात्री गारवा प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रब्बीच्या हंगाम ही वाया जातो कि काय त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहे.कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला या पिकांना फटका बसला असून शेतकरी वर्ग औषध फवारणी करण्यासाठी आता वैतागले आहे. यंदाचा खरीप हंगाम आधी शेतकºयांना डोकेदुखी व खर्चिक आणि आर्थिक गणित कोलमडणारा ठरला असून मक्यावर आलेल्या लष्करी आळी व द्राक्षावर डाउनी, भुरी नियंत्रणात आणण्यासाठी महागडी औषधे फवारणी करावी लागली.परतीच्या पावसाने शेतकºयांनी टाकलेली कांदा रोपे पूर्णता खराब होऊन गेल्याने शेतकरी वर्ग रब्बीच्या आशेने पिकांची पेरणी केली, परंतु ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून कांद्याची पात पिवळी पडुन करपा रोगाने कांदे सरकळ होत असल्याने फवारणी करावी लागत आहे. पुढे पाऊस पडतो कि नाही म्हणून शेतकºयांनी लवकर, गव्हाची पेरणी केली पण ढगाळ हवामानामुळे गव्हाचे पीक लवकर पोटारले असुन, त्यामुळे शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ येऊनही पाहिजे असे उत्पादन निघणार नसल्याने उत्पादनात घट येणार आहे.तर काही शेतकºयांनी नांगर घातला होता, तसेच आठ ते दहा दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा काढणीस सुरु वात होणार आहे, परंतु जर पावसाचे आगमन झाले तर कांदा सडून जाईल व शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. सतत बदलणारे हवामान बदलामुळे शेतकºयांची डोकेदुखी जास्त प्रमाणात वाढली आहे.प्रतिक्रि या..सुरवातीला पावसाची शाश्वती नसल्याने पावसावर गहू पिकाची पेरणी केली पण पेरणी केल्यानंतर ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाने गव्हाचे पिक बोकाडुन गेले, त्यामुळे पिक ठेवूनही खर्च फिटणार नसल्याने गहू पिकात गुरे सोडायची वेळ आली.- बाळासाहेब चव्हाणके, जळगाव नेऊर.गेली पंधरा दिवसापासून सतत पडणार सतत पडणारे धुके व दव यामुळे कांदा पीक पूर्णपणे करपुन गेले आहे, महागडी औषधे फवारणी करूनही रोगट वातावरण साथ सोडायला तयार नसल्याने मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. त्यामुळे कांदा पिकावर करपा येऊन कांदा पात करपत आहे, त्यामुळे औषध फवारणी किती दिवस करायची हा प्रश्न सतावत आहे.- भारत सोनवणे, कांदा उत्पादक जऊळके.
धुके, ढगाळ वातावरणामुळे पिके उध्दवस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 9:02 PM
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर व पश्चिमेकडील भागात सध्या दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे, शेतकरी चिंताग्रस्त बनला असून आता औषध फवारणी करून शेतकऱ्यांचा खर्च भरमसाट वाढत असून पिकांमध्ये सुधारणा होत नसल्याने औषधे फवारणी करु न वैतागून पिके सोडून देण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देजळगाव नेऊर : करपा, बुरशी रोगाच्या विळख्याने उत्पादन घटणार