न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन पूर्ण एक महिना उलटला असून पावसाळ्यातील रोहिणी व मृग हे दोन नक्षत्र ही संपले तरीही न्यायडोंगरी परिसरात पावसाची एक सरही पडलेली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर पिण्याच्या व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करणेही दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. मिळेल तेथून पाणी उपलब्ध करण्यासाठी महिला वर्गांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यात तर मागील वर्षी अत्यन्त कमी पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासुनच पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कधी एकदा जून महिना येतो व पाऊस पडतो. अशा आशाळभूत नजरा आकाशाकडे लागलेल्या असताना बघता बघता जून महिना ही संपत आल्याने ऐन दुष्काळात तेरावा महिना या म्हणीचा प्रत्यय येऊ लागला आहे. दर वर्षी प्रमाणे यंदा ही तीच गत होती का काय या चिंतेत सर्वच दिसत आहे.आमच्या प्रतिनिधीने परिसरात प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला असता अनेक ठिकानी खाजगी शेतकरी यांनीच आपल्या शेतातील विहिरी त्यावरील विजेच्या मोटारी लोकांसाठी तसेच जनावरांना पाणी मिळावे म्हणून खुल्या करून दिल्या आहेत. असाच प्रकार प्रत्यक्ष पाहण्यात आला तो हिंगणे देहरे येथील शेतकरी शिवाजी संपत बच्छाव यांच्या शेतातील विहिरी वरून जवळच असलेल्या पिंपरी हवेली तांडा नंबर दोन येथील शेतकरी व नागरिक मोठ्या प्रमाणात पाणी वाहून नेत असल्याचे छायाचित्र टिपण्यात आले आहे. या वरून ग्रामीण भागात पाण्यासाठी काय काय त्रास घ्यावा लागतो आहे. याची दाहकता समोर येते व अजून किती दिवस हा त्रास घ्यावा लागेल हे मात्र निसर्गाच्या मर्जीवरच अवलनबुन आहे असेच म्हणावे लागेल.दरम्यान चार महिन्या वर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इतक्या दिवस पासून शांत असलेले सर्वच पुढारी अचानक जागे झाले असून सर्वानाच नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा व शहरातील नागरिकांच्या पाण्याची, कर्जाची, विम्याची, जनावरांची काळजी वाटू लागली त्यासाठी कोणी थेट मंत्रालयात बैठका घेऊ लागले? तर कोणी प्रत्यक्ष गावोगावी फिरून शेतकऱ्यांनाच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले आहे. असे चित्र नांदगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे.हीच तळमळ वेळीच दाखवली असती तर या नांदगाव मतदार संघातील कोणालाच या भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला नसता तसेच अधिकाºयांच्या मनमानी कारभारामुळे हैरान व्हावे लागले नसते येत्या काही दिवसात दमदार पाऊस पडला नाही तर मागील तीन वर्षांचा अनुभव शेतकरी सोबत नागरिकांच्या डोळ्यासमोर फिरत आहे. पुढे कसे होईल या चिंतेत संपूर्ण जनता पडली असून पावसासाठी देवाकडे साकडे घातले जात आहे.
अद्याप पाऊस न बरसल्याने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 6:56 PM
न्यायडोंगरी : पावसाळा सुरू होऊन पूर्ण एक महिना उलटला असून पावसाळ्यातील रोहिणी व मृग हे दोन नक्षत्र ही संपले तरीही न्यायडोंगरी परिसरात पावसाची एक सरही पडलेली नाही, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर पिण्याच्या व जनावरांसाठी पाणी उपलब्ध करणेही दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. मिळेल तेथून पाणी उपलब्ध करण्यासाठी महिला वर्गांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
ठळक मुद्देन्यायडोंगरी : महिला वर्गांना पाण्यासाठी करावी लागते कसरत