सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.यंदा निफाड तालुक्यातील काही भागात जून महिन्यात पावसाचा थेंब देखील पडला नाही. जून महिन्यात सगळी नक्षत्र कोरडी ठाक गेली. जुलै महिन्यात तुरळक पाऊस पडला जमिनीत पाणी काही प्रमाणात जिरल्याने ओलावा तयार झाला. त्या ओलाव्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, भुईमुग या पिकांची लागवड केली. तर टमाटे, कोबी, फ्लॉवर, काकडी, मिरची, वेलवर्गीय पिके यांची लागवड केली.मोठ्या प्रमाणावर खर्च करून पिके शेतात उभी केली, मात्र पिके उभी राहत नाही तोच पावसाने ओढ दिली. अनेक दिवसांपासून पावसाच्या पाण्याचा थेंब देखील पडला नाही. विहिरी उन्हाळ्यात कोरड्याठाक पडल्या आहे. त्यामुळे शेतात पिकांना पाणी पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकरी सलग दोन वर्षपासून दुष्काळाचा सामना करत आहेत. जेमतेम हाती आलेली पिके कवडीमोल भावात विकावी लागली होती, कांदा, द्राक्ष सोयाबीन या पिकांचा खर्च देखील वसूल झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. यंदाची पिके शेतात उभी करण्यासाठी उसनवारी करीत बियाणे, खते खरेदी केली आहे. मोठया प्रमाणावर आलेला खर्च पावसाच्या लहरीपणामुळे वाया जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.शेतात लागवड केलेल्या पिकांचा पंचनामा करावा, जमिनीतुन न उगवणाºया बियाणांचा खर्च सरकारने देऊन शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहे.चौकट...दुकानदारांची उसनवारी करून बियाणे खरेदी केली आहे. पावसाचा जोर कायम राहील म्हणून काळ्या मातीत बियाणे फेकून मोठी जुगार शेतकरी खेळला आहे. पावसाने ओढ दिल्याने पिके उगवत नाही. उगवलेले पिके करपून गेल्याने दुभार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.- कांतीलाल खालकर, शेतकरी.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 7:18 PM
सायखेडा : गोदाकाठ भागात जुलै महिन्याच्या सुरवातीला झालेल्या जेमतेम पावसाने पुन्हा ओढ दिल्याने पेरणी केलेली पिके मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने बियाणे कुजले आहे, तर काही कोवळी पिके उन्हात कोमेजून जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुभार पेरणीचे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देसायखेडा : मातीतून कोंब बाहेर पडत नसल्याने दुभार पेरणीचे संकट