पाटोदा : येवला तालुक्यात चार पाच दिवसाच्या कडाक्याच्या थंडीनंतर दोन दिवस ढगाळ वातावरण तर सोमवार आणि मंगळवारी हवेत दिवसभर वाऱ्याच्या झुळकीबरोबर प्रचंड गारवा तसेच पहाटे मोठया प्रमाणात पडलेल्या दवबिंदूमुळे पिकांवर दवाची चादर पसरत असल्याने पिके सडू लागली असून त्यांची वाढ खुंटल्याने रब्बी हंगामातील संपूर्ण पिके धोक्यात आली आहे. या सततच्या बदलत्या हवामांमुळे पिकांवर विविध रोगांचे आक्र मण वाढल्याने खरीपा पाठोपाठ रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.सोमवारी पहाटे तर मोठया प्रमाणात धुके पडले तर दिवसभर हवेत गारवा असल्याने दिवसभर हुडहुडी जाणवत होती. या रोजच्या बदलत्या वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, मका,कांदे या पिकांवर मोठया प्रमाणावर मावा तसेच मर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर कांदा पिकावर माव्याबरोबरच करपा वाढल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. शेतकरी वर्गाने कांदा लागवडीसाठी एकरी सत्तर ते ऐंशी हजार रूपये खर्च केले आहे मात्र कांदा पिक हातचे जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. ढोबळी मिरची व भाजीपाला पिक घुबड्या व मावा रोगाने खराब झाले आहे.०००००००००००००००००००द्राक्षांवर डावणीचा प्रादुर्भावसध्या परिसरात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु आहे मात्र ढगाळ हवामान व दवामुळे द्राक्ष पिकावर डावणी व भूरीचे प्रमाण वाढल्याने व्यापारी वर्ग द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. संपूर्ण आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडयात झालेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण खरीप हंगामा वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या द्राक्षबागा जतन करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकरी अडीच ते तीन लाख रु पये खर्च केला आहे मात्र बदलत्या हवामानामुळे संपूर्ण द्राक्ष हंगाम धोक्यात आला आहे.खर्चापेक्षा काही पटीने उत्पन्न कमी निघाल्याने शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला असून तो आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दवबिंदूमुळे पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2020 3:48 PM