शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला
2
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
3
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
4
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
5
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
6
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
7
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
8
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
9
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
10
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
11
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
12
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
13
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
14
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
15
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
16
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
17
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
18
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
19
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
20
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला

नाशिक पूर्व विभागातील १२ धार्मिक स्थळांवर हातोडा

By admin | Published: November 12, 2016 12:54 AM

मनपाची कारवाई : किरकोळ वादाचे प्रसंग

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवारी (दि. ११) आपला मोर्चा नाशिक पूर्व विभागातील जुने नाशिक, टाकळीरोड तसेच उपनगर भागातील अनधिकृत धार्मिक स्थळांकडे वळविला. दिवसभरात महापालिकेने १२ अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला. जुन्या नाशकात चव्हाटा परिसरासह एक-दोन ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग घडले परंतु नंतर शांततेत कारवाई पार पडली. महापालिकेने सकाळी नाशिक पूर्व विभागातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधी कारवाईला सुरुवात केली. दिवसभरात नाशिक पुणे रस्त्यावरील बजरंगवाडी, टाकळी येथील दीपनगर, टाकळरोडवरील शांतीपार्क, उपनगर येथील इच्छामणी क्लिनिकजवळ, टाकळीरोड, शंकरनगर फॅनिंगजवळ, द्वारकावरील हॉटेल कावेरीमागे, जुन्या नाशकातील चव्हाटा, संभाजी चौक, डिंगरआळी अभ्यासिकेजवळील अनधिकृत धार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्यात आले. चव्हाटा परिसरात काही लोकांनी धार्मिक स्थळ पाडण्यास हरकत घेत मुदत वाढवून मागितली परंतु महापालिकेने कारवाई होणारच असल्याचे सांगत आपली प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे किरकोळ वादाचे प्रसंग घडले. त्यानंतर मात्र, महापालिकेने इतरत्र शांततेत मोहीम पूर्ण केली. नाशिक-पुणे रस्त्यावरील बजरंगवाडी येथील अनधिकृत धार्मिक स्थळाचे बांधकाम संबंधितांनी स्वत:हून काढून घेतले. सदर मोहीम अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्या नेतृत्वाखाली सहाही विभागीय अधिकारी तसेच पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आली. यावेळी दोन जेसीबी, तीन वाहने तैनात ठेवण्यात आली होती. महापालिकेने मंगळवारपासून मोहीम सुरू केली असून, चार दिवसात ८४ पैकी ३७ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)