ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा व मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.प्राचार्य व्ही. एस. कवडे यांच्या संकल्पनेतून सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून विविध मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा व विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विविध प्रकारच्या स्टॉलचा ग्रामस्थांनी आनंद घेत पार पडला. यावेळी सकाळच्या सत्रात रस्सीखेच, लिंबू-चमचा, संगीत खुर्ची, पोत्यातील उड्या, तीन पायांची शर्यत, स्लो सायकलिंग यांसारख्या मैदानी खेळासोबतच बादलीत चेंडू टाकणे, गाढवाच्या चित्रास शेपटी रेखाटने, बादलीत पाणी टाकणे यांसारखे मनोरंजनात्मक खेळांचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुराद लुटला.दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आनंद बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक, कांदापात, कढीपत्ता यांसोबत विविध प्रकारच्या रानभाज्या तसेच फळे आणि विशेष म्हणजे सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेल्या लसूण व कांद्याचा स्टॉल लक्षवेधी ठरला. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी समीक्षा आव्हाड हिने बाजारात विक्रीस आणलेला कांदा चढ्या भावाने लिलाव पद्धतीने विकला गेला.
भोर विद्यालयात आनंद मेळावा; मैदानी स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 11:01 PM