विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.येथूनच जवळ असलेल्या सुमारे १५०० लोकसंख्या असलेल्या डोंगरेज या गावात सद्यस्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गावासाठी राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा उद्भव या दुष्काळी परिस्थितीत पूर्णपणे कोरडा झाला असून गावपरिसरातील सर्वच विहिरींनीही माना टाकल्या आहेत. यामुळे गावातील महिला हंडाभर पाण्यासाठी अक्षरश: रानोमाळ भटकत आहेत.याच पार्श्वभूमीवर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी नुकतीच गावाला भेट देऊन पाणीसमस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यात विहीर अधिग्रहणासह टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे या बाबींवर चर्चा करण्यात आली. मात्र यात समाधानकारक मार्ग निघत नसल्याने सरपंच सुमन खैरनार यांनीच स्वमालकीच्या विहिरीचे पाणी गावाला उपलब्ध करून सामाजिक दायित्व निभवावे अशी विनंती तहसीलदारांनी केली. या विनंतीला सरपंच खैरनार यांनी तात्काळ संमती देत शेतीचे पाणी बंद करून गावाला पाणी उपलब्ध करून दिले आहे.शेतात दोन एकर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या भाजीपाला पिकाला तिलांजली देण्याचा निर्णय त्यांनी यासाठी घेतला आहे. अर्धा किलोमीटर पाईपलाईन द्वारे हे पाणी गावाच्या विहिरीत टाकले जात असून गावातील सर्व भागाला समान व सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी सुमनबाई जातीने लक्षही देतांना दिसून येत आहेत. त्यांच्या या पुढाकारामुळे गावाची पाणीसमस्या दूर झाली असून टँकरमुळे गावावर होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे. तसेच परिसरातील अन्य गावातील राजकारणी व जनता यांनाही यामाध्यमातून एक चांगला संदेश देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.गावाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. सरपंच म्हणून हीच जबाबदारी स्वीकारत शेतातील पिकाला दुर्लक्षित करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे गावाची तहान भागली असून एक चांगले सामाजिक कार्य केल्याचा आनंदही यातून पदरी पडला आहे.सुमन खैरनार (सरपंच, डोंगरेज)(फोटो १० सुमन खैरनार)
स्वत:च्या विहिरीचे पाणी केले गावासाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 6:01 PM
विरगाव : गावाला भेडसावणारी भीषण पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी आपल्या शेतातील दोन एकरवरील भाजीपाला पीक संपूर्णपणे सोडून देत गावाला स्वमालकीच्या विहिरीचे पाणी उपलब्ध करून देण्याचे काम डोंगरेज (ता.बागलाण) येथील महिला सरपंच सुमन खैरनार यांनी केले आहे. यांच्या या औदार्यामुळे गावाची तहान भागली असतांनाच शासनाचा गावावर टँकरपायी होणारा हजारो रु पयांचा खर्चही वाचला आहे.
ठळक मुद्देबागलाण : डोंगरेज गावाची भागली तहान ; सुमन खैरनार यांचे औदार्य