पाटोदा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाटोदा परिसरात मंगळवारी (दि.१२) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने सुमारे पाऊण तास जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या शेतात द्राक्ष तयार झाले आहे तसेच शेतकºयांनी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.सलग ३ ते ४ दिवस थंडीचे वातावरण असताना मंगळवारी दुपारपासून परिसरात दमट वातावरण निर्माण झाले होते. पाटोदा व परिसरात रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. पाऊस व जोरदार वाºयामुळे वीजपुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले. सुरूवातीस पावसाची कुठलीही चाहूल नसताना आलेल्या पावसाने शेतकºयांची अक्षरश: तारांबळ उडाली. शेतात पोळी घालून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकºयांची चांगलीच धावपळ झाली.तसेच या पावसात हातातोंडाशी आलेला द्राक्षबागेचा घास निसटण्याची भीती निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे.पाटोदा परिसरातील पाटोदा, ठाणगाव, विखारणी, आडगाव या भागातही पावसाने हजेरी लावली. वादळी वाºयामुळे काही ठिकाणी जनावरांसाठी जमा करून ठेवलेला चारा तसेच कडब्यापासून तयार केलेली कुटी वाºयाने उडाली असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.मनमाडला बेमोसमीमनमाड : शहर व परिसरात रात्री बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी रात्री अचानक रिमझिम पावसाचे आगमन झाले. या बेमोसमी पावसामुळे परिसरात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकº्यांची धांदल उडाली. थंडी मुळे द्राक्ष तसेच अन्य पिकांना हानी पोहचली होती. त्यातच बेमोसमी पावसामुळे शेतमालाचे अधिक नुकसान होणार आहे. भालूर परिसरात तुरळक स्वरूपाच्या बेमोसमी पाऊस झाल्याने चारा, भूस, कांद्याचे डोंगळे यांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
वादळी वाऱ्यासह बेमोसमी पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:41 PM
पाटोदा : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाटोदा परिसरात मंगळवारी (दि.१२) रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाने सुमारे पाऊण तास जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या शेतात द्राक्ष तयार झाले आहे तसेच शेतकºयांनी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्यामुळे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देपाटोदा : द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले; भालूरलाही पाऊस