शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

नाशिक जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 2:34 PM

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यातील पुर्व भागातून एक्झीट घेतल्यामुळे शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. पावसाच्या भरवश्यावर पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके करपू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना गुरूवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८१४ मिली मीटर

ठळक मुद्देपाणी साठ्यात वाढ : १२ धरणातून विसर्ग दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी आनंदला

नाशिक : तीन आठवड्याहूनही अधिक काळ दडी मारून बसलेल्या पावसाचे जिल्ह्यात सर्वदूर फेरआगमन झाल्याने सर्वत्र उल्हासाचे वातावरण निर्माण झाले असून, दुबार पेरणीच्या संकटात सापडलेला शेतकरी आनंदला आहे. गुरूवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात कोसळलेल्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले तर धरणाच्या साठ्यातही कमालिची वाढ झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून १२ धरणातून पाण्याचे विसर्ग करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या चार दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यातील पुर्व भागातून एक्झीट घेतल्यामुळे शेतकºयांचे तोंडचे पाणी पळाले होते. पावसाच्या भरवश्यावर पेरणी केलेल्या शेतकºयांची पिके करपू लागल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात असताना गुरूवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासात जिल्ह्यात ८१४ मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, त्यात सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात १०१ मिली मीटर पाऊस झाला आहे. त्या खालोखाल सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेवर येथे पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे आॅगष्टच्या दुसºया आठवड्यापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडलेल्या नांदगाव, मालेगाव, येवला, सिन्नर, निफाड, देवळा, बागलाण, चांदवड या तालुक्यांनाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेला मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर धरणाच्या साठ्यातही कमालिची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये ६८ टक्के जलसाठा झाला असून, त्यातील पाच धरणे शंभर टक्के फुल्ल झाल्याने त्यातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने आळंदी, भावली, हरणबारी, केळझर, वाघाड यांचा समावेश आहे. पावसाच्या सर्वदूर हजेरीमुळे गंगापूर धरण समुहात ९२ टक्के, पालखेड धरण समुहात९३, दारणा सुमहात ८० टक्के, गिरणा खोºयात ४० टक्के पाणी साठले आहे. काही धरणे ९० टक्क्यापेक्षा अधिक भरल्यामुळे पाटबंधारे खात्याने त्यातून विसर्ग सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने गंगापूर, वाघाड, दारणा, पालखेड, करंजवण, पुणेगाव, भावली, वालदेवी, चणकापूर, हरणबारी, केळझर व नांदुरमध्यमेश्वर धरणाचा समावेश आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्या, नाल्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसNashikनाशिक