याबाबत शिवाजी ठाकरे यांच्याशी संवाद साधला असता, मला लहाणपणापासूनच माणसं जोडायला आवडते. म्हणून माझे पाय समाजसेवेकडे वळले. नाशिकमध्ये शिक्षणासाठी आलो. पंचवटी काॅलेजला एम. काॅम. केले. बरेच दिवस रिक्षा चालवली. तेथेही गरजूंना मोफत सेवा दिली. आम्ही नवरा, बायको तीन ते चार दिवस भुके राहिलो त्यामुळे भूकेची मला कल्पना आहे. पत्नी कल्पनाने साथ दिली. मागच्या लाॅकडाऊनमध्ये आम्ही दोन तीन हजार लोकांना मोफत जेवण दिले. पत्नी कल्पना ह्या उत्कृष्ट कूक आहेत. त्यामुळेच आम्ही केटरिंगमध्ये उतरलो. एकदा नाशकात सिव्हिल हॉस्पिटल जवळून जाताना गर्दी दिसली. तेथील लोकांशी संवाद साधला तर कोरोना बाधितांच्या नातलगांचे नाश्त्याचे हाल होत असल्याचे कळाले. तेव्हा मी त्यांच्या अन्नपाण्याची सोय करण्याचा निर्धार केला. आम्ही तिघे भाडेतत्वावरच राहतो. मास्क सरकारी नियमाप्रमाणे वापरतो . परिसर सॅनिटाइजही करतो. आमची काळजी घेत लोकांच्या पोटाची काळजी घेतो. रोज सकाळी साडेनऊ वाजता एक मोठे पातेले भरुन पोहे, कधी उपमा, कधी शिरा, कधी खिचडी बनवतो. मुलगा पीयूष या कामात मदत करतो. या कामातून जे समाधान मिळते ते पैशांत मोजता न येण्यासारखे आहे, अशी भावनाही ठाकरे व्यक्त करतात.
इन्फो
लॉकडाऊन असेपर्यंत मोफत सेवा
शिवाजी ठाकरे सांगतात, फक्त लोकांना मोफत भोजन , नाश्ता वाटायचा आणि मुकाट घरी परतायचं असा दिनक्रम ठरलेला आहे. मी त्या लोकांना वचन दिलंय जोपर्यंत लाॅकडाऊन आहे तोपर्यंत भोजन देणार आहे. काही मित्रांचे फोन आलेत. मी त्यांना नाही म्हटलं. तरीही सुरेश सोनवणे या मित्राने दहा किलो पोहे आणून दिलेत, हेमंत पगार यांनी एक हजार रुपये पाठवलेत. कुणाकडून मदतीची अपेक्षा नाही. परंतु आपल्याला जे समाधान देते ते काम करत राहावे, हीच भावना घेऊन पुढे वाटचाल सुरू असल्याचेही ठाकरे सांगतात.
फोटो- २७ शिवाजी ठाकरे
===Photopath===
270421\27nsk_10_27042021_13.jpg
===Caption===
फोटो- २७ शिजाजी ठाकरे