ऑनलाइन लोकमतपेठ (नाशिक), दि. 3 - वाढदिवस म्हटला की खर्च आलाच. मित्रांना पार्टी देणं, मोठमोठे समारंभ, जेवणावळी यावर मोठया प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन ""आम्ही अहिराणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थे""च्या माध्यमातून खंबाळे (त्र्यंबकेश्वर) येथील अनाथ बालकाश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येऊन अनाथ बालकांसमवेत वाढदिवस साजरा करून समाजात एक आदर्श निर्माण केला.
आम्ही अहिराणी संस्थेच्या माध्यमातून निराधाराला आधार , बेरोजगारांना मार्गदर्शन, अहिराणी साहित्यिकांना,व्यासपीठ, स्त्रीभृण हत्या, हुंडाविरोधी जनजागृती, वाढदिवस,तसेच विवाहातील अनावश्यक खिर्चिक बाबी, अहिराणी गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आदी सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहेत तसेच अहिराणी भुषण,अहिराणी रत्न यांसारखे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या साठी सामुदायिक श्रम हे महत्त्वाचे आहे यात संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ कुठेही कमी पडणार नाही असेही संदीप अहिरे यांनी सांगितले. ""जेथे कमी तेथे आम्ही"" हे ब्रीदवाक्य घेऊन अहिराणी भाषेच्या विकासासाठी एक चांगले पाऊल या संस्थेने उचलले आहे.
शिरपूर येथील युवा उद्योजक धनंजय पाटील हे त्यांचा वाढदिवस दरवर्षी साध्या पद्धतीने साजरा करून गरजवंताना मदतीचा हात देतात. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संदीप पोपट अहिरे, उपाध्यक्ष भुषण बच्छाव, खजिनदार नरेंद्र आहेर, जेष्ठ संचालक रविंद्र मोरे, कैलास अहिरे, प्रभाकर सोलंकी, केतन इंगळे, युवा उद्योजक धनंजय पाटील,स्वप्निल देवरे यांचेसह विद्यार्थी ग्रामस्थ सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. अहिराणी भाषेच्या प्रचार व प्रसाराबरोबर समाजातील दुर्बल घटकांच्या मदतीसाठी अहिराणी सेवाभावी संस्था काम करीत असून म्हणूनच संस्थेने जठे कमी तठे आम्ही हे ब्रीदवाक्य सार्थक करण्याचा वसा घेतला आहे. खंबाळे येथील अनाथ आश्रमाला गत वीस वर्षापासून कोणत्याही प्रकारचे सरकारी अनुदान नसताना संचालक डॉ. रत्नाकर पवार यांनी या अनाथ बालकांना मायेचे छत्र दिले आहे. संस्थेच्या वतीने येथील मुलांना खाऊ व किराणा साहित्य वाटप करण्यात आले.- संदीप पोपट अहिरे, अध्यक्ष, आम्ही अहिराणी सेवाभावी संस्था.