शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कंटेनरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 10:41 PM

सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात पिकअपने कार व दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच सुमारास भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

ठळक मुद्देघोरवड घाटात अपघात : एक जण गंभीर जखमी

सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात पिकअपने कार व दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच सुमारास भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

बुधवारी (दि. १०) सकाळी साडेनऊच्या सुमारास सदर अपघात झाला. भास्कर हरिभाऊ बोराडे (५३, रा. गुंजाळवाडी, कर्जुले पठार, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून सुनील नानाभाऊ बोराडे (३६, रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिकअप जीप (क्रमांक एमएच १५ इजी २९०१) ही घोटीकडे भरधाव वेगात जात असताना पुढे चालणाऱ्या कारला (क्रमांक एमएच १५ एफटी २०९२) तिने पाठीमागून ठोस मारली व पुन्हा कारच्या पुढे चाललेल्या दुचाकीलाही (क्रमांक एचएच १२ जेडब्ल्यु ९५६९) ठोस दिली. त्यामुळे भास्कर बोराडे हे रस्त्यावर पडले. त्याच सुमारास घोटीकडून येणाऱ्या कंटेनरचे (क्रमांक एमएच ४६ बीएम १८१४) मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सुनील बोराडे हेदेखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रामदास त्र्यंबक खाडे यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.फोटो - १० घोरवड ॲक्सिडेंटसिन्नर- घोटी रस्त्यावर घोरवड घाटातील अपघातग्रस्त वाहने.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा