नाशिक-नाशिकरोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक- बिटको महाविद्यालयातील मराठी विभागातील १७ विद्यार्थीनींनी वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने स्वत: वाचलेल्या १७ थोर नेत्यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला. त्यांनी केलेल्या प्रभावी सादरीकरणाबद्दल व वाचनाची आवड जोपासल्याबद्दल त्यांचा १७ पुस्तके भेट देऊन गौरव करण्यात आला.यावेळी पूजा दंडगव्हाळ (भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण), प्रियंका तायडे (सत्याचा जलसा), धनश्री कुलकर्णी (चापेकर पर्व), दिपाली शिंदे (सावित्रीबाई फुले), निरंजना बिडगर (संत गाडगेबाबा), गौतमी पगारे (बलूतं), सोमनाथ आहिर (लोकमान्य टिळक), संतोष टोचे (अग्निपंख), दिपक जाधव (डॉ. आबेडकर), पंढरीनाथ गवळी (कर्मवीर भाऊराव पाटील, उज्वला रंधे (स्वातंत्र्यवीर सावरकर), शितल कंक (प्रकाश आमटे), तेजस्विनी सहाणे (सावित्रीआई फुले), मोना बागुल (पाचोळा), प्रियंका कटारे (मुक्ती कोन पथे), छाया काळे (यशोगाथा) यांनी स्वत: वाचलेल्या पुस्तकाविषयीचे अनुभव थोडक्या सादर केले. यावेळी सुरूवातीला महाविद्यालयाच्या वतीने डॉ. उत्तम करमाळकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनपटाची चित्रफित सादर केली. प्रा. आर. टी. अहेर यांनी वाचन प्रेरणा दिनाच्यानिमित्ताने उत्कृष्ट पुस्तक वाचन करणाऱ्या १७ विद्यार्थीनींना पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी प्रा. अनंत येवलेकर, प्राचार्य डॉ. धनेश कलाल, उपप्राचार्य डॉ. एस. एन. तुपे, उपप्राचार्य डॉ. दिलीप बेलगावकर आदि उपस्थित होते.
‘त्यांनी’ सादर केला १७ पुस्तकांचा परिचय, १७ पुस्तके भेट देऊन ‘त्यांचा’ झाला गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 4:35 PM
वाचन प्रेरणादिन : नाशिकरोडच्या चांडक-बिटको महाविद्यालयाचा उपक्रम
ठळक मुद्देवाचन प्रेरणादिन : नाशिकरोडच्या चांडक-बिटको महाविद्यालयाचा उपक्रम