याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नानेगाव साखर कारखान्याच्या रस्त्यावरुन पवार हे त्यांच्या दुचाकीने (एम.एच१५ बीटी९५०३) जात होते. यावेळी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावरकरनगर लोकवस्तीजवळ नानेगावकडून दगड-माती घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरच्या (एम.एच१५ डीयू ४५९४) ट्रॉलीला त्यांची दुचाकी येऊन धडकली. या अपघातात पवार यांच्या डोक्याला ट्रॉलीचा जोरदार फटका बसल्याने त्यांचे शीर धडापासून वेगळे झाले. या अपघातप्रकरणी ट्रॅक्टरचालक विकास दगु सानप याने दिलेल्या फिर्यादीनुसार देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला
शनिवारी झालेल्या अपघातात नानेगावहून आपल्यागावी परतणाऱ्या तीस वर्षीय युवकाला प्राण गमवावा लागला. ट्रॅक्टरमध्ये मुरूमाची चोरटी वाहतूक सुरु असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. ट्रॅक्टर व दुचाकीमध्ये झालेला अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार पवार यांचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला. यावेळी मदतीसाठी धाऊन आलेले प्रत्यक्षदर्शींच्याही अंगावर शहारे उभे राहिले. याप्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर-ट्रॉली, दुचाकी पोलीस ठाण्यात जमा केली आहे. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस करीत आहेत. नानेगाव रस्त्याने मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिजाची चोरटी वाहतूक सुरु असते; मात्र याकडे कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दिवसरात्र होणारी गौणखनिजाची बेकायदेशीर वाहतुकीची माहिती महसूल प्रशासनाला असूनही या मार्गावर आजपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल होत नाही.
---
फोटो आर वर १७ट्रॅक्टर नावाने सेव्ह केला आहे.