मुख्याध्यापकांना सध्या १० वी १२ वी परीक्षा केंद्र संचालक, उत्तरपत्रिका तपासणी करून घेणे, पाचवी ते नववी परीक्षा निकाल प्रशासकीय कामकाज, नियामक व निकाल वेळेवर लागले पाहिजे यामुळे मुख्याध्यापक तसेच १० वी १२ वी उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्याची मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी केली होती. विषय समजावून घेऊन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी अरूण आनंदकर यांनी त्वरित मुख्याध्यापकांचे व नियामक शिक्षकांचे निवडणूकीचे काम रद्द करण्याचे आश्वासन दिले. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ सलग्न सर्व तालुक्यातील मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील तहसीलदार, तालुक्याचेनिवडणूक निर्णय अधिकारी यांना संघाच्या वतीने निवेदन द्यावे व तालुक्यातील मुख्याध्यापकांची यादी मुख्याध्यापक संघाकडे पाठवावी. वरील सर्वांना निवडणूक कामातून मुक्त करण्याचे आश्वासन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
निवडणूक कामातून मुख्याध्यापकांना वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 5:34 PM