सिन्नर : अखिल भारतीय राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळाचे ५८ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन गुरुवारपासून (दि.१५) नांदेड येथे सुरू होत आहे.नाशिक जिल्ह्यातून ३००हून अधिक मुख्याध्यापक या अधिवेशनासाठी जाणार असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली. अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक चव्हाण, पालकमंत्री रामदास कदम आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे स्वागत अध्यक्षपद माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत हे भूषवणार आहेत. अधिवेशनादरम्यान जिल्हातील १३ मुख्याध्यापकांचा आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मान होणार आहे.यामध्ये सुनील फरस, अजय पवार, गोरख कुलधर, अशोककदम, पुरुषोत्तम रकिबे, कांतिलाल नेरे, देवेंद्र ठाकरे, बाळू शेवाळे, शरद गिते, एम. व्ही. कुवर, कान्हू देवढे, अनिता पवार, उल्का कुरणे आदींचा समावेश आहे. यावेळी मुख्याध्यापक संघाचे मार्गदर्शक सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, एस. बी. शिरसाट, उपाध्यक्ष माणिक मढवई, राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, बी. वाय. पाटील, शुभलक्ष्मी कुलकर्णी, संगीता बाफना, परवेझा शेख, दीपक ह्याळीज, किशोर पालखेडकर आदी उपस्थित होते.
नांदेड येथे मुख्याध्यापकांचे अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 6:10 PM