गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ व विस्तार अधिकारी मंजुषा साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यशाळेस मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव एस. बी. देशमुख, प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यकार्याध्यक्ष अंबादास वाजे यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. तालुक्यातील १०० टक्के शाळा तंबाखूमुक्त होण्यासाठीचे ११ निकष सलाम इंडिया अॅपवर कसे अपलोड करावे याबाबत शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी माहिती सांगितले. यानंतर सन २०१९/२० ची शाळासिदधी माहिती वेबसाईड कशी भरावी व त्यातील ७ क्षेत्रांचे गुणांकन कसे घ्यावे हे समजावून सांगितले. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती रजिस्ट्रेशन प्रकिया कशी करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ यांनी प्रशासकीय मार्गदर्शन करत आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण होण्यासाठीचे निकष समजावून सांगत जास्तीत जास्त शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजे असे सांगितले. १० डिसेंबर अखेर तालुक्यातील सर्व शाळा तंबाखुमुक्त झाल्याच पाहिजे तसेच शाळासिद्धीमध्ये जास्तीत जास्त शाळा अ श्रेणीत राहतील यासाठी क्षत्रीय अधिकारी यांनी शाळांना विशेष मार्गदर्शन करावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी निर्मळ यांनी केले.
सिन्नर येथे मुख्याध्यापकांची तालुकास्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 6:06 PM