जिल्हा परिषदेच्यामुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व शिक्षण विभाग यांच्या संयुक्तपणे कळवण पंचायत समिती येथे अंगणवाडी सेविका , मदतनीस , आशावर्कर , बचत गट महिला तसेच माध्यमिक महिला शिक्षिका यांच्या साठी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटनानंतर नाशिक जिल्हा परिषद येथील मार्गदर्शक सुनील दराडे , मुख्याध्यापक विजया पाटील , विजया ढेपले आदींनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी प्रशिक्षणास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कळवण न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती रत्ना पारखी , पंचायत समिती सभापती जगन साबळे , उपसभापती पल्लवी देवरे , कळवण वकील संघाचे अध्यक्ष शशिकांत पवार , संजय पवार , गटशिक्षणाधिकारी एस.जी.बच्छाव , सहायक गटविकास अधिकारी डी.ई.जाधव , सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड आदीं उपस्थित होते.दुपारच्या सत्रात कळवण न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती रत्ना पारखी यांनी महिलांबाबत कायद्याची जनजागृती या विषयावर बोलताना सांगितले कि आजची महिलांनीनवीन कायदे समजून घेऊन त्या स्वत: सक्षम झाली पाहिजे , समाजात महिलांचा आदर केला पाहिजे तरच बदल शक्य आहे.त्यानंतर वकील संघाचे एम.डी.बोरसे , श्रीमती एन.पी.पवार , एच.एस.पगार मनोज सूर्यवंशी ,पी.ए.पाटील , गणेश वळीनकर , आर.आर.पाटील , एच.एस.पगार , वर्षा नाईक ,आदींनी महिलांसंदर्भातील कायदा व सुरक्षितता आदी विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी एस.डी.महाले , डी.ए.पवार , श्रीमती एस.बी.कोठावदे ,शारदा पाटील ,योगिता फड , पेसा समन्वयक मीरा पाटील , सचिन मुठे , विजय ठाकरे , कैलास चौरे , शिरीष मुठे, संजय पवार आदींनी परिश्रम घेतले.