नाशिक : जीवघेणी स्पर्धा, त्यातून येणारे ताणतणाव, नैराश्य, सोबत फ्री मिळणारे आजार या साऱ्यांमुळे धकाधकीच्या मानवी जीवनात हास्याचे मोल नव्याने अधोरेखित होत आहे. विनोदी नाटक, पुस्तके, कविता याबरोबरच हसतखेळत जीवन जगल्यास आरोग्य तर चांगले राहतेच, पण काम करण्यास नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे चांगली कामे उभी राहण्यास मदत होते. या साºया गोष्टी लक्षात घेता नाशिक शहरात आजच्या मितीला शंभराहून अधिक हास्य क्लब कार्यरत असून, या क्लबमध्ये सहभागी होणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. हास्य क्लबच्या माध्यमातून आता नाशिककर स्वत: आपल्या आरोग्याची चांगली काळजी घेत असून, या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलता जपत विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवित आहे. मध्य नाशिक, सिडको, सातपूर, नाशिकरोड, पंचवटी अशा पाच प्रमुख विभागांतर्गत प्रत्येकी २५ ते ३० हास्य क्लब कार्यरत असून, हास्य क्लबद्वारे आबालवृद्धांना तासभर तणावरहित आनंदी क्षणांची अनुभूती दिली जात आहे. १९९७ साली सुषमा दुगड, आदिती वाघमारे व सहकाºयांनी शहरात हास्य क्लबची स्थापना केली. नंदिनी हास्य क्लब हा शहरातला पहिला हास्य क्लब मानला जातो. पूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातच असणारे क्लब आज शहराच्या प्रत्येक भागात सुरू झाले आहेत. स्वत:बरोबरच आपण समाजाचेही देणे लागतो हे लक्षात घेऊन या क्लबद्वारे स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक निर्मूलन, गरीब मुलांचे शैक्षणिक पालकत्व, गोरगरिबांना शालोपयोगी, गृहोपयोगी वस्तू भेट देणे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
आरोग्याची काळजी : सामाजिक उपक्रमांवरही दिला जातोय भर नाशकात शंभराहून अधिक हास्य क्लब कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:50 AM
नाशिक : जीवघेणी स्पर्धा, त्यातून येणारे ताणतणाव, नैराश्य, सोबत फ्री मिळणारे आजार या साऱ्यांमुळे धकाधकीच्या मानवी जीवनात हास्याचे मोल नव्याने अधोरेखित होत आहे.
ठळक मुद्देक्लबमध्ये सहभागी होणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर प्रमुख विभागांतर्गत प्रत्येकी २५ ते ३० हास्य क्लब कार्यरत