सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांची वाटचाल डिजिटलकडे होत असताना आता जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात सहा आरोग्य केंद्रांसाठी सहा कोटी रु पयांचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करण्यात आला आहे.या निधीमधून आरोग्य केंद्राचे बांधकाम, सर्व सोयीसुविधांनी अद्ययावत आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे जिल्हा परिषदेमार्फत विविध आरोग्य केंद्र अद्ययावत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात बागलाणमधील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी सुमारे पाच कोटी ९३ लाख रु पयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना चांगल्या दर्जाची भौतिक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार यांच्याकडे केली होती.सभापती पगार यांनी डिजिटल प्राथमिक शाळा, अंगणवाड्या या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य केंद्राचे बांधकाम व अद्ययावत सोयीसुविधांसाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे सादर केला होता.पहिल्या टप्प्यात बागलाण तालुक्यातील अलियाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २ कोटी ६२ लाख रु पये, नीरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ६३ लाख, केळझर व कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी प्रत्येकी ६० लाख रु पये, मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५७ लाख रु पये, साल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५५ लाख रु पये, वीरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ३६ लाख रु पये मंजूर करण्यात आले आहेत.आरोग्य केंद्रांच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मर्यादित निधी मिळत असल्यामुळे अडचणी निर्माण होतात. परिणामी ग्रामीण आदिवासी भागातील रु ग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते. हे थांबविण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून बागलाणसाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.- यतिन पगारसभापती, शिक्षण व आरोग्य
बागलाणमधील आरोग्य केंद्रही होणार डिजिटल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:19 PM
सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांची वाटचाल डिजिटलकडे होत असताना आता जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात सहा आरोग्य केंद्रांसाठी सहा कोटी रु पयांचा निधी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करण्यात आला आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियानातून बागलाणसाठी निधी उपलब्ध