शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केद्रांचे आरोग्यमंत्र्यांना गाऱ्हाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 10:55 PM

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बराचसा भाग दुर्गम आणि अतिदुर्गम असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचा सीमापरीघ व्यापक असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा बजाविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीच्या आजाराने डोके वर काढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्र्यांना साकडे:

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बराचसा भाग दुर्गम आणि अतिदुर्गम असल्याने आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राचा सीमापरीघ व्यापक असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा बजाविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात कोरोनासारख्या महामारीच्या आजाराने डोके वर काढले असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांना तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यात शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांसह स्तनदा माता, गरोदर माता, विविध वयोगटांतील बालक तसेच डिलिव्हरी व उपचार घेणाऱ्या रुग्णाचा ग्रामीण भागातही आरोग्य केंद्र, उपकेंद्राकडे ओढा दिसून येत आहे. परंतु कधी काळी रुग्णवाहिकेविना मुकण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याने अंजनेरी, हरसूल, ठाणापाडा गटातील प्राथमिक आरोग्य केंद्राना नवीन रुग्णवाहिका मिळावी, तसेच आरोग्य केंद्रातील रिक्तपदे तत्काळ भरावीत आदी मागण्यांचे निवेदन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नाशिक येथील भेटीप्रसंगी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करण्यात यावा, यासाठी नवीन रुग्णवाहिका देण्यात याव्यात तसेच आरोग्य केंद्रात पूर्ण कर्मचारी पदे भरलेली नाहीत, सद्यस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकर भरावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, जिल्हा नेते अरुण मेढे, सामाजिक कार्यकर्त्या भारती भोये, रवींद्र भोये, मुक्तार शेख आदींसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार