मालेगाव : येथील पुष्पाताई हिरे महिला महाविद्यालयात प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन डॉ. नीलिमा सावंत यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य श्रीमती एन. एस. देसले होत्या.यावेळी डॉ. सावंत त्यांनी यशस्वी जीवनासाठी सुदृढ आरोग्याचे महत्त्व विशद केले. हिमोग्लोबीन कमतरता, दृष्टिदोष इत्यादि विविध बाबींवर प्रकाश टाकून योग्य आहार-विहार व आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले.कार्यक्रमास प्रा. योगीता पाटील, प्रा. डॉ. ए. सी. लोखंडे, प्रा. ए. सी. सेवेकरी, प्रा. मंगला सोनवणे, प्रा. डॉ. आर. एन. सावंत, प्रा. योगिता पाटील, प्रा. डॉ. ए. सी. लोखंडे, प्रा. एस. आर. जोशी, प्रा. डॉ. अन्सारी, प्रा. जाधव, श्रीमती ए. ए. पवार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
हिरे महिला महाविद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर
By admin | Published: September 27, 2016 11:27 PM