वेळुंजे : ठाणापाडा (ता. त्र्यंबकेस्वर) येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ५३२ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा या अतिदुर्गम भागात आरोग्य आणि शैक्षणिकदृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी माकपचे जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांनी परिसरातील शिक्षक आणि अधिकारी यांच्याशी चर्चा करून उपक्र म राबविण्याचा निर्णय घेत विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले.यात पालकांसह ५३२ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. पंचायत समिती सभापती ज्योती राऊत, जी. प. सदस्य रमेश बरफ, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे, प. स. सदस्य देवराम मौळे, हरसूल पोलीस स्टेशनचे विशाल टकले, शिक्षण विस्तार अधिकारी आर. आर. बोडके, सरपंच महेंद्र पवार यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर घेण्यात आले. यावेळी मुलींच्या हिमोग्लोबिनसह, रक्तगट आदी तपासणी करण्यात आली.यावेळी माजी जी. प. सदस्य भाऊराज राथड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडित गावित, मुख्याध्यापक तुकाराम कामडी, ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, विनायक गावित आदींसह ग्रामस्थ, विविध पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिदूर्गम ठाणापाड्यात राहणाऱ्या विद्यार्थी-पालकांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 6:04 PM
वेळुंजे : ठाणापाडा (ता. त्र्यंबकेस्वर) येथे विद्यार्थी आणि पालकांसाठी घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ५३२ विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.
ठळक मुद्देआरोग्य आणि शैक्षणिकदृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी