त्र्यंबकेश्वर : तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असुन त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन मुख्य शहरात व परिसरात दररोजचे रूग्ण वाढत आहे. दरम्यान तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान आरोग्य कमर्चारी व त्यांच्या जोडीला त्र्यंबक नगरपरिषद, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत कमर्चारी या मोहीमेत सहभागी झालेले आहेत. आजपर्यंत त्र्यंबक नगरपरिषद हद्दीत १०६ रुग्ण तर जिल्हा परिषद हद्दीतील ग्रामीण भागात १७२ रुग्ण पॉझिटिव्ह होते. आतापर्यंत १९८ रूग्ण बरे होउन घरी परतले आहेत. तसेच आता पर्यंत सहा जणांना प्राण गमवावा लागला.सध्या कोव्हीड केअर सेंटर मध्ये पॉझिटिव्ह ३९ रुग्ण दाखल आहेत. गजानन महाराज कोव्हीड आरोग्य केंद्रात सात रुग्ण दाखल असुन कोव्हीड उपचार केंद्रात दोन रुग्णांवर आॅक्सिजन लाउन उपचार सुरु आहेत. तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णां मुळे तालुक्यात ४८ कन्टेन्मेन्ट झोन तयार केले असुन २० कन्टेन्मेन्ट झोन अॅक्टीव आहेत. या कन्टेन्मेन्ट झोनमध्ये ५५९६ इतके लोक प्रतिबंधीत केले आहेत. या कन्टेन्मेन्ट झोनसाठी २० जणट तैनात आहेत. एकट्या त्र्यंबकेश्वर शहरात गावाच्या विविध भागात मिळुन 23 रुग्ण दाखल आहेत तर तालुक्यातील हरसुल अंजनेरी रोहीले दलपतपुर खंबाळे आदी गावातील मिळुन ५१ रुग्ण दाखल आहेत.त्र्यंबकला नागरिकांची तपासणी करताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.