नाशिक : शहरात झालेली अतिवृष्टी आणि गोदावरी, नासर्डीसह अन्य नद्यांना आलेल्या महापुरामुळे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालये व मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत पूरग्रस्तांसाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरांचे उद्घाटन राजीव गांधी भवन येथे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिरांसाठी शहरातील खासगी रुग्णालयांनी आपले वैद्यकीय पथक उपलब्ध करून दिले आहे. सिक्स सिग्मा हॉस्पिटलमार्फत सातपूर परिसरातील कांबळेवाडी, स्वारबाबानगर, आनंदवली, चुंचाळे शिवार, डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमार्फत हिरावाडी परिसरातील गणेशवाडी मार्केट, राजेंद्रनगर, साबळेवाडा, नागचौक, मरीमाता मंदिर, चिंचबन, वजे्रश्वरी, अंबिकानगर, वसंतदादानगर, महालक्ष्मीनगर, सार्थक हॉस्पिटलमार्फत एमएचबी कॉलनी, सातपूर परिसरातील महादेववाडी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर, साईबाबा हॉस्पिटलमार्फत जिजामाता परिसरातील रामकुंड परिसर, संजयनगर, वाघाडी, फुलेनगर, शताब्दी हॉस्पिटलमार्फत कथडा परिसरातील काजी गढी, शिवाजीवाडी, वोक्हार्ट हॉस्पिटलमार्फत वडाळागाव परिसरातील वडाळागाव, भारतनगर, सुविचार हॉस्पिटलमार्फत बजरंगवाडी परिसरातील सिद्धार्थनगर, लाईफ केअर हॉस्पिटलमार्फत मोरवाडी परिसरातील मोरवाडी, उंटवाडी, शांतीनगर, गौतमनगर, सुजाता बिर्ला हॉस्पिटलमार्फत नाशिकरोड परिसरातील वालदेवी परिसर, मालधक्कारोड, सरदार चाळ, आम्रपाली झोपडपट्टी, इंदिरानगर परिसरातील श्रमिकनगर, फुलेनगर, अपोलो हॉस्पिटलमार्फत तपोवन परिसरातील शेरेमळा, नांदूरमानूर, ऋषिकेश हॉस्पिटलमार्फत रामवाडी परिसरातील मंगलवाडी, मल्हारखाण, तळेनगर आदि ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
मनपामार्फत पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी
By admin | Published: August 08, 2016 11:24 PM