मालेगाव : हिरव्या भाज्यांचा अभाव; दुष्काळामुळे पोटाची खळगी भरणाऱ्यांचे हालखडकी : गेल्या चार-पाच वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्य उत्पादनात घट झाल्याने ग्रामीण भागात रोज एक सांज खिचडीचाच आहार घेतला जात आहे. स्वस्त धान्य दुकानातही गव्हाला जास्त मागणी असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्टÑातील बहुतांश भागात चालू वर्षी मोठा दुष्काळ निर्माण झाला आहे. या अगोदरही सतत चार-पाच वषे दुष्काळाच्याच छायेत गेली. मात्र यंदाचा दुष्काळ ग्रामीण जनतेला चांगलाच जाणवत आहे. जंगलातही झाडपाला उरलेला नाही. यामुळे जनावरांसह माणसांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले आहे.अन्नधान्याचे उत्पादन नगदी पिकाच्या तुलनेत घटले आहे. पावसाचेही प्रभाव घटल्याने हातावर काम करणाऱ्या नागरिकांचे आर्थिक अडचणीसह पोटाची खळगी भरण्याचेही दुरापास्त होत चालले आहे. पावसाचे प्रमाण घटल्याने अशीच स्थिती राहिली तर दुष्काळाची स्थिती भयावह होणार आहे. यामुळे ग्रामीण जनतेला मानसिक आधार मिळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकरी खचणार आहे. शेतकऱ्यांवरील संकटे कमी होत नाही तर वाढतच आहेत. यामुळे पोट भरण्यासाठी विविध तर्कविर्तक लढविले जात आहे.ऐन दुष्काळात रोजगार हमीची कामे बंद झाल्याने आर्थिक आवक बंद झाली आहे. रोजगार हमी योजनेची किती कामे झाली यासाठी अधिकारी निरुत्तर आहेत. त्यातच पोटाची भूक भागविण्यासाठी गहू, बाजरी या अन्नधान्याचे उत्पादन घटल्याने स्वस्त धान्य दुकानातील गहू, तांदूळच भूक भागवत आहेत. त्यातही चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी रोजगार बुडवून पाण्याच्या शोधार्थ भटकावे लागत आहे. सायंकाळी दररोज खिचडीचा आहार यामुळे नुसती खळगी भरण्यापलीकडे स्वस्त धान्याचा खुराक आरोग्याला पोषण भेटण्याऐवजी आरोग्य अशक्त होत आहे. यामुळे ग्रामीण भागात फक्त दिवसामागून दिवस लोटणे असे म्हटले तर वावगे ठरू नये.स्वस्त धान्य दुकाने आज ग्रामीण जनतेची भूक भागवत असले तरी त्यातून फक्त खळगीच भरत आहे. पोषण मिळण्यासाठी स्वत:च्या शेतातील गहू, बाजरी, अन्नधान्य पुरेसे ठरणार आहे.- ज्ञानेश्वर पवार, शेतकरी, दसाणे
निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 12:02 AM
मालेगाव : हिरव्या भाज्यांचा अभाव; दुष्काळामुळे पोटाची खळगी भरणाऱ्यांचे हालखडकी : गेल्या चार-पाच वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे अन्नधान्य उत्पादनात घट झाल्याने ग्रामीण भागात रोज एक सांज खिचडीचाच आहार घेतला जात आहे. स्वस्त धान्य दुकानातही गव्हाला जास्त मागणी असल्याने मोठ्या रांगा लागत आहेत. निकृष्ट आहारामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठळक मुद्दे चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागत आहे.