शैलेश कर्पेसिन्नर : केवळ एक हजार रुपयांचा निधी मंजूर असताना, जुनी इमारत पाडण्याचे धाडस दाखवून त्या ठिकाणी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त वास्तू साकारण्याची किमया आमदार माणिकराव कोकाटे यांनी साधली. त्यामुळेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयात हजारो कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या निधीतून साकार झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या या वास्तूचे वाजतगाजत लोकार्पण न करता, थेट या इमारतीत सिन्नरच नव्हे, तर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार झाले.कोरोनाची पहिली लाट आली, त्यावेळी तालुक्यात कुठेही जास्त रुग्ण उपचारांसाठी दाखल करता येईल, असे रुग्णालय नव्हते. सुदैवाने सिन्नर ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण झाले होते. या इमारतीत आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार कोविड सेंटर सुरू करण्यात आले. लोकार्पण करण्यापूर्वीच सदर वास्तू कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून आल्याने, हजारो रुग्णांवर या ठिकाणी यशस्वी उपचार झाले. सिन्नर तालुक्यात आजपर्यंत १९ हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील काही रुग्णांवर खासगी तर अनेक रुग्णांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. इंडिया बुल्स येथेही कोविड सेंटर सुरू केल्याने ग्रामीण रुग्णालयावरील भार काहीसा हलका होण्यास मदत झाली.कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर कोकाटे यांनी महसूल, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस, पंचायत समिती या खात्यातील सर्व अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या. शासनाच्या नियमाबरोबरच जनता कर्फ्यूचा निर्णय घेऊन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. कोकाटे यांनी कोरोनाचे औषधे व साहित्य खरेदीसाठी ५० लाख रुपयांचा आमदार निधी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केला. ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स सेंटरमध्ये बेडची संख्या वाढविण्यासह खासगी कोविड रुग्णालयास मदत केली. औषधसाठा, रेमडेसिविर इंजेक्शन उपब्लधतेसाठी सातत्याने प्रयत्न केले. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाने संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करावा, यासाठी वेळोवेळी आवाहन केले. वडांगळी व घोटेवाडी ग्रामपंचायतीने उभारलेल्या विलगीकरण कक्षाला मदत व मार्गदर्शन केले.सिन्नर तालुक्यात कधीही ऑक्सिजनची कमरता भासू दिली नाही. औद्योगिक वसाहतीत सुमारे चार प्लांट असल्याने, त्यांच्या बैठका घेण्यासह अडचणी सोडविण्यासाठी कोकाटे यांनी मेहनत घेतली. लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलून तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, पोलीस निरीक्षक संतोष मुरकुटे, एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, वावीचे पोलीस निरीक्षक सागर कोते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.वर्षा लहाडे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांच्या वारंवार बैठका घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेत समस्या मार्गी लावल्या.पूर्वी सिन्नर शहरात तीन लसीकरण केंद्र होती. पहाटेपासूनच लोकांना लसीसाठी रांगा लावण्याची वेळ येऊ लागली होती. तेव्हा कोकाटे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना करून, मतदार यादी भागानुसार एकाच ठिकाणी लसीकरणाची सूचना केली. त्यामुळे आता लसीकरणातील वशिलेबाजी व गर्दीला आळा बसला.अनेकांनी जपली सामाजिक बांधिलकीसिन्नर तालुक्यात मुसळगाव माळेगाव या दोन औद्योगिक वसाहती आहेत. कोरोनाच्या अडचणीच्या काळात बेडसह औषधे व साहित्याचा तुटवडा भासू लागल्यानंतर, आमदार कोकाटे यांनी कारखानदार व नागरिकांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार, अनेक कंपन्यांनी कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य देण्यास प्रारंभ केला. अनेक कंपन्यांनी सीएसआर फंडातून मदत केली. औषधांसह ऑक्सिजन मशीन, व्हेंटिलेटर ग्रामीण रुग्णालयास दिले. बेड, चादरी, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर आदींसह अनेक आरोग्य साहित्य ग्रामीण व इंडिया बुल्स रुग्णालयास मिळाले.सिन्नर ग्रामीण रुग्णालयाची वास्तू साकारल्यामुळे अनेक रुग्णांवर मोफत उपचार झाले. आता जिल्ह्यातील सर्वात मोठे चिल्ड्रन कोविड हॉस्पिटल\सिन्नर ग्रामीण रुग्णालयात साकारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत\सिन्नर तालुका स्वयंपूर्ण आहे. तालुक्यातील प्रत्येक रुग्ण आपल्या घरातील असल्याप्रमाणे काळजी घेतली. \सिन्नर तालुक्यात आजही पाचशेच्या वर बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. कोणतीही आरोग्य सुविधा कमी पडू देणार नाही.- माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नरशासकीय कोविड सेंटर - २ऑक्सिजन प्लांट - १रुग्णवाहिका - ८१०८ रुग्णवाहिका- ४ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर- १० डुरा सिलिंडर - १ बीआयपीएपी मशीन - ६ग्रामपंचायत विलगीकरण कक्ष - ४०
रुग्णालयाची इमारत उभारण्यासह पुरविल्या आरोग्य सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 10:42 PM
सिन्नर : केवळ एक हजार रुपयांचा निधी मंजूर असताना, जुनी इमारत पाडण्याचे धाडस दाखवून त्या ठिकाणी सिन्नर ग्रामीण रुग्णालयाची प्रशस्त वास्तू साकारण्याची किमया आमदार माणिकराव कोकाटे यांनी साधली. त्यामुळेच सिन्नर ग्रामीण रुग्णालयात हजारो कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या निधीतून साकार झालेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या या वास्तूचे वाजतगाजत लोकार्पण न करता, थेट या इमारतीत सिन्नरच नव्हे, तर जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार झाले.
ठळक मुद्देसर्वात मोठ्या चिल्ड्रन कोविड रुग्णालयासाठी प्रयत्न; ५० लाखांचा आमदार निधी