सिन्नर : तालुक्यातील धनलक्ष्मी शिक्षण संस्थेच्या वडझिरे महाविद्यालयात सॅनेटरी नॅपकिन यंत्र बसविण्यात आले. या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले. आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थिनींना याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले. उज्ज्वला कातकाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास नायगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा भालेराव, करुणा जाधव, दीपिका क्षत्रिय, शैला चौधरी, सुजाता नंद, मंगल कासार, कविता सोनवणे, वर्षा शिंदे आदी उपस्थित होते. दीपिका क्षत्रिय यांनी सॅनेटरी नॅपकिनची प्राथमिक माहिती दिली. उगम, विकास व पॅडमन चित्रपटावर विद्यार्थिनींना सविस्तर माहिती देताना क्षत्रिय यांनी प्रबोधन केले. प्रा. उज्ज्वला कातकाडे यांनी सॅनेटरी नॅपकिन वापराची गरज व्यक्त केली. संस्थेने विद्यार्थिनींच्या सुविधेसाठी व आरोग्याची काळजी म्हणून यंत्र बसविले असून, त्याचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. पाच रुपयांचा क्वॉइन टाकताच नॅपकिन उपलब्ध होणार आहे. प्रियंका राणा आणि प्रा. शैला चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी सुजाता नंद, मंगल कासार आदींनी प्रयत्न केले. वयपरत्वे शारीरिक बदल होत जातात. यावेळी विद्यार्थिनींनी आईशी संवाद ठेवला पाहिजे. त्यासाठी आई व मुलीत मैत्रीचे नाते हवे, असे प्रबोधन वैद्यकीय डॉ. मनीषा भालेराव यांनी केले. वयात येताना शारीरिक काळजी घेण्याची गरज असून, उत्तम आरोग्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचे आवाहन भालेराव यांनी केले.
विद्यार्थिनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:12 AM