शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

त्र्यंबकेश्वरमधील आरोग्य धोक्यात

By admin | Published: September 26, 2015 10:40 PM

त्र्यंबकेश्वरमधील आरोग्य धोक्यात

त्र्यंबकेश्वर : कुंभमेळ्यानिमित्त भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी संपूर्ण गावाच्या कानाकोपऱ्यात, गल्लीबोळात मोठ्या प्रमाणात मलमूत्र विसर्जन केल्याने त्र्यंबकवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कुंभमेळा वर्षभर असल्याने भाविकांचा ओघ सुरूच राहणार आहे. होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने मोठ्या प्रमाणात स्वच्छतागृह उभारले मात्र लोकांना त्याबद्दल केलेले मार्गदर्शन कमी पडल्याने, त्यांची उभारणी दूर अंतरावर असल्याने भाविकांनी त्या स्वच्छतागृहांकडे, शौचालयांकडे पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. सोमवार (दि. २७) पासून लवकरच पितृपक्ष सुरू होत असल्याने भाविकांची गर्दी आता रोजच सुरू राहणार असल्याने आरोग्य विभागाने हा प्रश्न आताच मार्गी लावला, व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली आणि वरुणदेवाची कृपा होऊन एक-दोन दिवस तरी मुसळधार पाऊस झाला तरच ही घाण, कचरा वाहून जाऊ शकेल आणि रोगराई आटोक्यात येऊ शकेल. आरोग्य विभागाने त्वरित संपूर्ण गावात रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. हे पाऊल तत्काळ उचलले गेले नाही, तर भाविकांसह येथील स्थानिकांनी एखादी साथ पसरल्यास जबर किंमत मोजावी लागणार आहे. स्वच्छता मोहीम राबविली जावी आणि त्यात भाविकांचा, स्थानिकांचाही सहभाग करून घ्यावा तरच येथील आरोग्य नियंत्रणात राहू शकेल, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.