शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

आरोग्य, सुरक्षेत भर घालणार : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 11:18 PM

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

नाशिक : मालेगावमध्ये पुरेसे डॉक्टर्स, पोलीस आणि एसआरपीएफ यंत्रणा आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास ती अजून वाढवून मालेगावमधील कोरोनाचा फैलाव रोखण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. येथील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी सर्वते प्रयत्न केले जातील, असे महाराष्टÑाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.जिल्ह्यातील मालेगावमध्ये मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ४४ बाधित रुग्ण आढळून आल्याने सर्व यंत्रणांसह जिल्हादेखील हादरून गेला. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आणि विशेषत्वे मालेगावच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे आदी मंत्रीदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना देशमुख यांनी सध्याच्या घडीला मालेगावमध्ये १८०० पोलीस तैनात असून, गरज पडल्यास एसआरपीएफचे सुरक्षा दलदेखील वाढवले जाणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय अतिरिक्त ६० डॉक्टर्सची सेवादेखील मालेगावला दिली आहे. पोलीस, आरोग्य यंत्रणा किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेवर हल्ले झाल्यास शासन ते खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय जे पोलीस फ्रंटलाईनवर काम करतात, त्यांना शासनाच्या वतीने पीपीई किटदेखील देण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याशिवाय राज्यात कुठेही पोलिसांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख आणि वारसांना नोकरी देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात सर्वच ठिकाणी प्रशासन यंत्रणा दिवस-रात्र लढत असून, मालेगावमध्ये अधिक पोलीस, डॉक्टरांची गरज लागणार का याचा आढावा घेतला जाणार असून, परिस्थिती लवकर कशी आटोक्यात आणता येईल, त्यावर लक्ष केंदित करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.--------प्रेमाने न समजल्यास पोलिसी खाक्यानागरिकांना प्रेमाने समजावून सांगण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही जर कुणी ऐकत नसेल तर त्यांना पोलिसी खाक्या कसा दाखवायचा ते पोलिसांना माहिती असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. आतापर्यंत १५६ ठिकाणी ५५० जणांवर हल्ले झाले असून, पोलीस किंवा आरोग्य यंत्रणेवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसल्याचेही ते म्हणाले.--------त्याबाबत मुख्यमंत्री ठरवणारमहाराष्ट्र तसेच मुंबईत परप्रांतीय नागरिक, कामगार जास्त असून, त्यांना त्यांच्या गावाला पाठविण्याची सरकारची इच्छा असून, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतला जाईल. तसेच त्याबाबत अन्य संबंधित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मगच मुख्यमंत्री त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nashikनाशिक