शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण मोहीम इगतपुरीत राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 5:21 PM

घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने इगतपुरी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करून व्हॅक्सीनच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेची बाब

घोटी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने इगतपुरी तालुक्यासारख्या ग्रामीण भागातही आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करून व्हॅक्सीनच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान, ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्वत्र चिंतेची बाब आहे. त्यामुळे ग्रामसेवकांनी मुख्यालयी थांबून उपाययोजनांबाबत जनजागृती करावी. बाहेरजिल्ह्यातून गावात आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत कार्यवाही करावी. प्रत्येक गावात लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठीही जनजागृती करावी, गावगावांत करोनाबाबत लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांची टेस्ट करून घेण्याबाबत प्रबोधन करण्याची मागणी इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापती विमल तोकडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.चार जिल्ह्यांची सीमारेषा असलेल्या इगतपुरी तालुक्यात कामानिमित्त नागरिकांची रहदारी कायम असते. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. यावर मात करण्यासाठी उपाययोजनांबरोबरच जनजागृती करणेही अत्यावश्यक आहे. शासन टेस्ट, ट्रेसिंग व ट्रीटमेंट ही मोहीम राबवित असताना नागरिकांनीही दक्षता घेत शासन नियमांचे पालन करणे, उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, मास्क लावणे, हात धुणे व फिजिकल डिस्टसिंगचे पालन करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल