नाशिक : समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘आविष्कार’ प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन म्हैसेकर यांनी केले.यावेळी प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागचे संचालक डॉॅ. संदीप गुंडरे, वैद्य श्रीराम सावरीकर, डॉ. तापस कुंडू, डॉ. प्रीती बजाज, डॉ. व्ही. आर. सोनांबेकर, डॉ. राहुल पाटील, डॉ. ज्योती दुबे, डॉ. स्वानंद शुक्ल, डॉ. जया कुरुविल्ला, डॉ. मित्रा, डॉ. देवकर, डॉ. स्वप्नील शिवगुंडे, श्रीमती विद्या ठाकरे, डॉ. स्वप्नील तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कुलगुरू म्हैसेकर यांनी सांगितले की, समाजात असणाºया समस्यांचा विचार करून त्याला उपयुक्त ठरणारे संशोधनाची कास विद्यार्थ्यांनी धरली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्त वाढीस लागावी, त्यांना संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, त्यांच्या संशोधनास व्यासपीठ मिळावे तसेच केलेल्या संशोधनाला लोकमान्यता मिळावी असे विविध हेतू साध्य व्हावे यासाठी विद्यापीठाचे कुलपती यांच्या प्रेरणेने ‘अविष्कार’ संशोधन प्रकल्प आंतरविद्यापीठस्तरीय महोत्सव सुरू करण्यात आला आहे. यावेळी प्रतिकुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. या संशोधन महोत्सवाकरीता संबंधित विषयातील परीक्षकांनी महत्त्वपूर्ण कार्य पार पाडले. अविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेकरीता विद्यापीठातील राजेश पाटील, श्रीमती सीमा नाटेकर, स्मिता करवल, दिनेश चव्हाण आदी कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.सहा संवर्गामधील ३२७ विद्यार्थ्यांचा सहभागविद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय आविष्कार प्राथमिक निवड चाचणी स्पर्धेत वाङ्मय, भाषा व ललितकला, वाणिज्य, व्यवस्थापन व कायदा, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामधील एकूण ३२७ विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे १९९, पदव्युत्तर (पीजी)चे १०५, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल., पीएच.डी) व शिक्षक (टिचर)चे २३ स्पर्धक सहभागी आहेत.
आरोग्य विद्यापीठ : आविष्कार संशोधन महोत्सव प्राथमिक निवड चाचणीसमाजोपयोगी संशोधनाला प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:49 AM
नाशिक : समाजाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, अशा प्रकारच्या उत्तम संशोधन प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे विशेष प्रोत्साहन दिले जाईल, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.
ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्त वाढीस लागावीआंतरविद्यापीठस्तरीय महोत्सव सुरू