नाशिक : शहरात काही दिवसांपुर्वी ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत होता. मात्र आता हे चित्र बदललेले आपल्याला दिसत आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्वोपरी उपाययोजना राबविण्यात येत असून शहरातील कचरावेचक महिलांचेही यासाठी योगदान असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी महापालिकेतर्फे सर्व मदत केली जाईल, असे महापौर सतिष कुलकर्णी यांनी सांगितले. सोशल एम्पॉवरमेंट फॉर व्हॉलंटरी अॅक्शन संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि.३१) गंजमाळ येथील रोटरी क्लबमध्ये कचरावेचक महिलांच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. शहरी आरोग्य व कचरा व्यवस्थापन यावर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात कचरा वेचणाऱ्या महिला दुर्गंधी, घाणीच्या ठिकाणी जाऊन आरोग्यास घातक कचरा गोळा करतात. त्या एक प्रकारे महापालिकेचे काम करत आहेत. पुण्यासह इतर महापालिका अशा महिलांसाठी विविध योजना राबवत आहे. त्या धर्तीवर नाशिक महापालिका या महिलांनी गोळा केलेल्या प्लॅस्टिक कचºयाला महापालिका १० ते १५ रूपये दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या ज्योती नटराजन या होत्या. नटराजन यांनी कचरा वेचक महिलांचे महामंडळ स्थापन करून शासनाने त्यांच्यासह त्यांचे कुटुंबियांची सुरक्षा, मुलांचे शिक्षण, आरोग्य यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. या महिला कचरा वेचतात म्हणजे त्या घाण नाहीत. त्या या समाजाचा घटक असून समाज्याच्या आरोग्यास घातक ठरणारा कचरा त्या दुर करतात. समाजाने त्यांच्याकडे स्वच्छता दूत म्हणून पहावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेविका वैशाली भोसले, संजय साबळे, आरोग्य अधिकारी सुनिल बुकाने, अॅड. विनय कटारे, राधा सहेगल, आसावरी देशपांडे, आयटकचे सचिव राजु देसले, चित्रा भवरे आदी उपस्थित होते. प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष राजपालसिंग शिंदे राणा यांनी तर केली तर सुत्रसंचालन यशवंत लाकडे यांनी केले. आभार बाबाजी केदारे यांनी मानले.
कचरावेचक महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 5:00 PM
शहरात काही दिवसांपुर्वी ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसत होता. मात्र आता हे चित्र बदललेले आपल्याला दिसत आहे. यासाठी महापालिकेतर्फे सर्वोपरी उपाययोजना राबविण्यात येत असून शहरातील कचरावेचक महिलांचेही यासाठी योगदान असून त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी महापालिकेतर्फे सर्व मदत केली जाईल, असे महापौर सतिष कुलकर्णी यांनी सांगितले.
ठळक मुद्देआरोग्याच्या देखभालीसाठी महापालिकेतर्फे सर्व मदत केली जाईलप्लॅस्टिक कचºयाला महापालिका १० ते १५ रूपये दर देण्याचा प्रयत्न करणार महिलांसाठी विविध योजना राबवत आहे