येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित सावित्री उत्सव प्रसंगी त्या बोलत होत्या. सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास वडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगरसेविका ॲड. ज्योती भोसले, तंत्रस्नेही शिक्षक वैशाली भामरे, तालुका कार्याध्यक्ष सुधीर साळुंके मंचावर उपस्थित होते. कोविड-१९ काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आशा वर्कर्स तसेच आरोग्य सेविकांचा सत्कार सेवा दलाच्या वतीने करण्यात आला.
शाहीर अशोक फराटे गीत मंचच्या सोनल सोनवणे, ऋतुजा पाठक, ईरा फराटे, पूर्वा कुदळे, उत्तरा कुदळे, अवनी वाणी, क्षितिजा सोनार, अवंती वाणी यांनी सावित्रीच्या ओव्या सादर केल्या तर सेवा दल मंडळ सदस्य स्वाती वाणी यांनी गीत सादर केले. प्रारंभी प्रतिमेस अतिथींच्या हस्ते खादीचा हार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक राज्य सचिव नचिकेत कोळपकर यांनी केले. नगरसेविका ज्योती भोसले, वैशाली भामरे यांची भाषणे झाली. यावेळी मामको बँकेचे संचालक राजेंद्र भोसले, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे, माजी उपायुक्त अशोक कापडे, जावीद अहमद, एच. एस. मंडळ, सौ. मंगला देवरे, श्रीमती ए. टी महाजन, कविता मंडळ आदींसह आरोग्य सेविकांचे कुटुंबीय उपस्थित होते. कोळपकर यांनी सूत्रसंचलन केले. उत्सव समिती अध्यक्ष राजीव वडगे यांनी आभार मानले.
-------------
सत्कारार्थी आरोग्य सेविका , आशा वर्कर्स
उज्ज्वला पानसरे, विनया भालेकर, सुवर्णा कुमावत, रुथ रमेश शिंदे, स्नेहा आडबले, श्रीमती एलिना जाॅन मायकल, डिंपल पाटील, मंजू तायडे, रेखा निकम, मोनालीसा मोहन, शशिकला बच्छाव, वैशाली बच्छाव, उज्ज्वला कचवे, विजया सूर्यवंशी, अर्चना शेवाळे, सरिता मोरे, रुपाली कोठावदे, सोनाली बच्छाव, अरुणा भदाणे, दीपाली बैरागी, उषा खैरनार, दीपाली बागुल, जयश्री बागुल, भाग्यश्री बागुल, शालिनी गांगुर्डे, रेखा खैरनार, सुरेखा जगताप या आरोग्य सेविका आणि डॉ. संदीप खैरनार यांचा कोविड काळातील कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला.