न्यायडोंगरी : श्री क्षेत्र शनि महाराज संस्थानतर्फे आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आर्किटेक्ट अश्विनी आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी होते. तर व्यासपीठावर माजी आमदार अनिल आहेर, माजी सरपंच डॉ राजेंद्र आहेर, उपसरपंच ॲड. अमोल आहेर, शनि महाराज संस्थानचे अध्यक्ष नारायण अग्रवाल, डॉ. रोहन बोरसे, डॉ. अशोक ससाणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस. आर. वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. आशा स्वयंसेविकांना पैठणीसाडी, रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.-----------------------
न्यायडोंगरीत आशा स्वयंसेविकेचा सत्कार करताना अश्विनी आहेर. (०३ न्यायडोंगरी)
===Photopath===
030621\331003nsk_23_03062021_13.jpg
===Caption===
०३ न्यायडोंगरी