ओझर टाऊनशिप : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्यसेवक या पदावरून आरोग्य सहाय्यक या पदावर तब्बल ३१ आरोग्यसेवकांना पदोन्नती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य संघटनेचे कोषाध्यक्ष व ओझर आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक अनिल राठी यांनी दिली. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला गतिमान प्रशासनाने प्रतिसाद देत पदोन्नतीचा मार्ग सुकर केला असून, ३१ आरोग्यसेवकांना आरोग्य सहाय्यक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शेखर पाटील, सूर्यकांत मैंद, स्वप्निल कोठारकर यांनी पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. संघटनेच्या वतीने राज्य समन्वयक बाळासाहेब ठाकरे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र चव्हाण, राज्य कार्यकारी सचिव बाळासाहेब कोठुळे, जिल्हा अध्यक्ष विजय सोपे, विलास पगार, अनिल धोंडगे, कंकरेज नाना, प्राथमिक आरोग्य केंद्र ओझरचे सूरज हरगोडे यांनी पदोन्नती मिळणेकामी प्रयत्न केले असल्याचे सांगून विलास पगार, राजा वाघ, अनिल धोंडगे, प्रवीण पाटील यांच्यासह आरोग्यसेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली असल्याचे अनिल राठी यांनी सांगितले. (१५ ओझर १)
150921\15nsk_19_15092021_13.jpg
१५ ओझर १